ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे मोफत फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबिर…
गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात येत आहे.आपण सर्वांनी नुसते आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा अंसासर्गिक आजार प्रतिबंधासाठी सक्रिय पावले उचलली पाहिजेत.शाळांपासूनच व्यायामाचे महत्त्व, फिजिओथेरपीविषयी जागरूकता वाढवणे गरजेचे असल्याचे डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी म्हटले आहे.
दि. 7 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या भौतिक उपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर व वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय माहुर्ले यांचे उपस्थितीत बाह्यरुग्ण विभागात फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बाह्यरुग्णालयातील लोकांना विविध फिजियोथेरेपी आणि व्यायामाचे प्रकाराचे प्रात्यक्षिक व त्याचे महत्व समजावुन सांगितले.
…………………………………………………………………………………………………
तिशीतच गरज ‘फिजिओथेरपी’ची
आजकाल कामधंदासाठी वाढता दुचाकी व चारचाकी वाह्नाचा वापर यामुळे कित्येक किलोमीटर होणारा दुचाकीवरील प्रवास, खड्ड्यांमधून गाडी आदळल्याने बसणारे झटके आणि सातत्याने संगणकावर काम करण्याच्या पद्धतीमुळे तरुणाईला मान आणि पाठदुखीने त्रासले आहे.२५ ते ३५ वयातील सुमारे ७० टक्के तरुणांना फिजिओथेरपीचे उपचार घ्यावे लागत आहे.पूर्वी चाळिशी, पन्नाशीच्या पुढे येणारे पाठीचे दुखणे आता तरुण वयातच भेडसावत असून या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचारासोबतच फिजिओथेरपी आणि नियमित व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय माहुर्ले यांनी यावेळी सांगितले.
सलग काही तास संगणकासमोर काम करताना खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसले जाते. त्याचा मान आणि पाठीवर ताण येते.त्याचप्रमाणे वाहनांचा वापर वाढला असून दररोज कामासाठी लांबवर करावा लागणारा प्रवास, वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला लागणारा अधिक वेळ आणि रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहने चालविताना पाठ, मानेवर येणारा ताण यांमुळे मानेचे आणि खांद्याचे स्नायू दुखायला लागतात.बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या तरुणांच्या आहारातही बदल झाला आहे. त्यामुळे हाडे, स्नायू कमकुवत होत आहेत. त्यामुळे नोकरदार तरुण वर्गाला फिजिओथेरपीची गरज भासत आहे.डोकेदुखी,रक्तदाब,अॅसिडिटी, मधुमेह, स्थूलता,हृदयरोग आणि ऑस्टिओआर्थरायटिस आजार झपाट्याने वाढत आहेत तसेच तोल जाणे यासारखे त्रास सुरू होतात. संबंधित त्रास असणाऱ्या रुग्णांना फिजिओथेरपीच्या मदतीने जीवनमान सुधारण्यास मदत होते.हृदयविकार आणि स्ट्रोकनंतर पुनर्वसन: कार्डिअॅक रिहॅबिलिटेशनसाठी खास व्यायाम पद्धतींचा उपयोग केला जातो, ज्यामुळे रुग्णाचे हृदय आरोग्य सुधारते.मधुमेह आणि लठ्ठपणा: वजन नियंत्रणासाठी फिजिओथेरपी व्यायाम उपयोगी पडतो.यामुळे स्नायुंची कार्यक्षमता वाढत असल्याचे भौतिक उपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी यावेळी म्हटले आहे.
…………………………………………
सदर फिजिओथेरपी शिबीरात तज्ञ डॉ.चेतना रहांगडाले,स्टाफ नर्स ईंदिरा पटले,रितेश निशाने, सोमनाथ मुंडे,आशिश सुरपाटने,रितेश बक्षी, शिला बावणकर,लिलाबाई भोयर,सुषमा चव्हाण, मनिशा बोबणे, प्रेरना लोहबरे व खंडरे यांनी लोकांचे रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब पातळी तपासणी करुन आरोग्य सेवा दिली. असंसर्गजन्य आजाराबाबतचा प्रभाव कमी करायचा असेल, तर औषधोपचाराच्या जोडीने फिजिओथेरपी व नियमित व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग मानावा लागेल. आजच आरोग्याकडे गांभीर्याने पाहूया आणि शरीरासाठी वेळ द्या – कारण चांगले आरोग्य हेच खरे संपत्ती आहे.
- डॉ.कांचन भोयर ,भौतिक उपचार तज्ञ

