LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट

आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

गोंदिया : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवन येथे आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी भेट घेऊन उच्च शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी गडचिरोली येथे सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण नागपूर येथील रिक्त पीठासीन अधिकारी पदी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात यावा, राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी यांचे सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचे नियुक्ती दिनांक पासून डीसीपीएस (परिभाषित अंशदान योजना) मूळ पगाराच्या १०% प्रमाणे शासन हिश्याच्या रकमेची मागणी करून कर्मचाऱ्यांच्या खात्यात भरणा करण्यात यावा, डीसीपीएस/एनपीएस निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत दि. १.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सेवा जोडण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात यावे व अन्य मागण्यांबाबत चर्चा करून आमदार सुधाकर अडबाले यांनी मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अनिल भारसाकळे, अमरावती शहर अध्यक्ष श्री. नंदकिशोर नवरे यांची उपस्थिती होती.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *