LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

elephant return : गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तींच्या कळपामुळे शेतकरी भयभीत

गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पुन्हा एकदा elephant return जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याची घटना गुरुवारी १२ मार्च रोजी समोर आली आहे. तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव-बंध्या परिसरात बुधवारी रात्री उशिरा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने सुमारे २५ ते ३० जंगली हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने शेतशिवारातून मार्ग काढताना मका व भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. elephant return त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दयाराम घुगुसकर व तेजराम गुरनुले या शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकाचे हर्तीच्या कळपाने नुकसान केले आहे. हत्तींचा कळप आल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच गोठणगाव व अर्जुनी-मोरगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या वनविभागाच्या पथकाकडून हत्तींच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, elephant return अचानक हत्तींचा कळप गावाजवळ आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जाणे किंवा एकटे फिरणे टाळा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षीही अशाच प्रकारे जंगली हत्तींच्या कळपाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घालत मोह‌फुल, धान व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. सध्या हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, बोड्दा मार्गे माहूरकुडा व महागाव परिसरातून वडेगाव-बंध्या भागात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासनाकडून नुकसान‌भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *