LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची माजी मंत्री स्व.महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

 गोंदिया : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे आज (ता.16) जिल्हा दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी वित्तमंत्री स्व. महादेवराव शिवणकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी त्यांनी आमगाव येथे स्वर्गीय महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉ. भोयर यांनी शिवणकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांचे दुःखात सहभागी होत आस्थेने विचारपूस केली. स्व. महादेवराव शिवणकर यांनी राज्याच्या जनसेवेत दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *