LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

बोगस बियाण्यांवर कठोर कारवाईच्या सूचना : आमदार विनोद अग्रवाल

खरीप हंगामपूर्व आढावा सभा संपन्न
गोंदिया | नवचैतन्य वृत्त

गावनिहाय प्रगतशील शेतकरी तयार करण्यावर भर देत खत लिकिंग व बोगस बियाण्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी दिल्या. त्या तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि विभाग गोंदिया यांच्या विद्यमाने आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते.
उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांच्या कार्यालयीन सभागृहात नुकतीच ही सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विनोद अग्रवाल होते. आढावा घेताना आमदार अग्रवाल यांनी तालुक्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर विशेष भर देण्याचे सांगितले. आंबा, पेरू, सीताफळ, चिकू तसेच तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कृषि विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांनी कामनिहाय दैनंदिनी तयार करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद गोंदियाच्या कृषि व पशुसंवर्धन सभापती श्रीमती दिपा चंद्रीकापूरे, पंचायत समिती गोंदियाचे सभापती श्री. मुनेश रहांगडाले, उपसभापती श्री. शिवलाल जामरे, माजी उपसभापती श्री. निरज उपवंशी, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वैशाली पंधरे व कु. आनंदा वाढीवे, पंचायत समिती सदस्या श्रीमती शैलेजा सोनवाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे, कृषि उपसंचालक तथा उपविभागीय कृषि अधिकारी श्री. महेंद्र ठोकळे, कृषि विज्ञान केंद्र हिवरा येथील उद्यानविद्या शास्त्रज्ञ श्री. विजय कोरे, विषय विशेषज्ञ श्री. मनोज भोमटे, तालुका कृषि अधिकारी कु. नेहा आढाव यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी कु. नेहा आढाव यांनी प्रस्तावना सादर करत खरीप हंगामाचे नियोजन व योजनांचा आढावा मांडला. मंडळ कृषि अधिकारी श्री. रेशीम रामटेके यांनी मृद व जलसंधारण योजनांची, तर श्री. सुमित नंदनवार यांनी पोकरा योजनेची माहिती दिली. तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री. सुनील खडसे यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषि अधिकारी श्री. टी. एस. तुरकर व श्री. जे. टी. मेंढे यांनी केले. या सभेला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व कृषि विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *