LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तुमसर तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेतीवाटप सुरू – तहसीलदार

भंडारा : शासनाच्या विविध घरकुल योजनेकरीता 5 ब्रास पर्यंत मोफत वाळु उपलब्ध करुन देणेबाबत, तसेच  स्थानिक रहीवाशांना त्यांचे घराच्या बांधकामाकरीता वाळुची मागणी केल्यास कमाल 5 ब्रास च्या मर्यादित स्वामीत्वधन आकारुन व जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर निधी आकारुन ऑनलाईन पद्धतीने वाळ उपलब्ध करुन देणे. तसेच मुद्या क्र. 3 नुसार ग्रा. पं. क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन अशा वाळु गटामधुन सदर बांधकामाच्या अंदाजपत्रकानुसार आवश्यक सर्व शुल्क वसुल करुन वाळुचा पुरवठा दिनांक 08/04/2025 च्या शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे कार्यपद्धतीनुसार वाळु उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश आहेत.
तुमसर तालुक्याअंतर्गत सुकळी दे-2, माडगी, ढोरवाडा, उमरवाडा-2, वारपिंडकेपार-2, लोभी- 4. आष्टी, देवसर्रा व पांजरा रे-2. असे एकुण 09 रेतीघाटातुन रेती उत्खनन व वाहुतक करण्यासबंधाने मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडुन दिनांक-04.12.2025 चे आदेशान्वये मंजूरी प्राप्त झालेली आहे. घरकुल लाभार्थी यांना रेती उचल करण्यासबंधाने सबंधित गावास रेतीघाट नेमुण दिलेले आहे. तरी सदरचे बाबतीत माहीती सबंधित गावचे ग्राम महसुल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडुन लाभार्थी यांनी माहीती प्राप्त करुन घ्यावी.
दिनांक-11/12/2025 रोजी रेती वाटपास सुरवात होत आहे. सबब घरकुल धारक यांनी त्यांचे गावाला नेमुण दिलेल्या रेतीघाटावरुन रेती उचल करण्याकरिता रेती उत्खनन व वाहतुक करण्याकरिता ट्रॅक्टर व लेबरची व्यवस्था लाभार्थी यांनी स्वतः करावयाची आहे. रेती उचल करण्याकरिता घरकुल लाभार्थी यांनी रेतीघाटावरील रेती वाटपाकरिता नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांचा घरकुल लाभार्थी यांचा मोबाईल क्र. व आधारक्रमांक ईत्यादी माहीती देउन शक्य तेवढ्या लवकर रेती उचल करावी. घरकूल लाभार्थी व इतर व्यक्ती यांनी त्यांना अनुज्ञेय वाळू त्रयस्थ व्यक्ती यांना दिल्याचे वा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची वाळू ही अनधिकृत समजून लाभार्थी व इतर व्यक्ती, तसेच संबंधित त्रयस्थ व्यक्ती यांचेवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, भारतीय न्याय संहिता 2023 व प्रचलित कायद्यांमधील तरतुदीनुसार दंडात्मक तथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी., असे तहसीलदार तुमसर गणेश दिघे यांनी कळवले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *