LatestNewsगोंदियाविदर्भ

nagar parishad election result : दिग्गजांना धक्का; नगर परिषदेच्या २९ नव्या चेहर्‍यांची एंट्री

१५ माजी नगरसेवकही परतले
गोंदिया :
अत्यंत अटीतटीची ठरलेली नगर परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली असून या निवडणुकीत मतदारराजाने चक्क २९ नवख्यांना नगर परिषदेत पाठविले आहे. तर १५ माजी नगरसेवकही परत एकदा नगर परिषदेत परतले आहेत. यामुळे नगर परिषदेत नवे चेहरे यंदा जास्त प्रमाणात दिसणार आहेत. माजी नगरसेवकांना प्रवेश मिळाला असला तरी यामध्ये काही दिग्गजांना मात्र धक्का बसल्याने त्यांना ‘एंट्री’ मिळाली नाही.सुमारे साडे तीन वर्षे प्रशासकराज राहिल्याने सर्वांनाच नगर परिषद निवडणुकीची (nagar parishad election result) उत्सुकता लागून होती. अशात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणुकीचा मुहूर्त निघाला व बघता-बघता निवडणूक आटोपून रविवारी (दि.२१) उमेदवारांच्या भाग्याचा फैसलाही लागला. यंदा एक प्रभाग वाढून २२ प्रभागांतील ४४ सदस्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत बहुतांश माजी नगरसेवकांनी परत रिंगणात उडी घेतली असतानाच नवख्या चेहर्‍यांचाही भरणा दिसला. यामध्ये काही तर अगदीच नवखे राहिले असून काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा धक्का बसल्याने त्यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरविले होते. रविवारी (दि.२१) आटोपलेल्या (nagar parishad election result) मतमोजणीत मात्र तब्बल २९ नवख्यांना मतदारराजाने नगर परिषदेत पाठविले असतानाच १५ माजी नगरसेवकांनाही परत एकदा ‘एंट्री’ मिळाली आहे. यामुळे नगर परिषदेत आता नवे चेहरे दिसणार असतानाच माजी नगरसेवकही दिसून येतील. विशेष म्हणजे, या नवख्यांनी दिग्गजांनाही संकटात टाकले होते व त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची राहिली.

निकाल राहिला धक्कादायक

१ रविवारी (दि.२१) मतमोजणीला प्रभाग क्रमांक १ व २ पासून सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक एकमधील पहिलाच निकाल (nagar parishad election result) धक्कादायक निघाला. येथील भाजपचे दिग्गज उमेदवार घनशाम पानतावणे यांना काँग्रेसचे उमेदवार अमर रंगारी यांनी ८४१ मतांनी पराजित केले.तर त्यांच्यासोबत असलेल्या अनिता मानकर यांना ज्योती फुंडे यांनी १६४ मतांनी पराजित केले. पहिल्याच निकालात दिग्गजाला धक्का बसल्याचे दिसून आले.त्यानंतर राजकुमार कुथे, ललिता ३ यादव, भावना कदम, शकील मंसूरी अशा दिग्गजांनाही निकालात धक्का बसला.

या माजी नगरसेवकांचे ‘कमबॅक’

निवडणुकीत तब्बल १५ माजी नगरसेवकांना परत एकदा मतदारांनी पसंती दाखविल्याने त्यांचे नगर परिषदेत ‘कमबॅक’ झाले. यामध्ये मैथुला बिसेन, शिव शर्मा, सुनील भरणे, पंकज यादव, सुनील भालेराव, चंद्रकला देशमुख, अनिता मेश्राम, विवेक मिश्रा, दीपिका रूसे, नेहा नायक, राकेश ठाकूर, क्रांती जायस्वाल, शिलू ठाकूर, निर्मला मिश्रा, विजय रगडे यांचा समावेश आहे.

या नवख्यांना मिळाली ‘एंट्री’
निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये अमर रंगारी, ज्योती फुंडे, चंद्रकुमार चुटे, निती रॉय, संगीता देशमुख, कैलाश यादव, राज शुक्ला, शिशिर बिसेन, सीमा अग्रवाल, अजय यादव, अ‍ॅड. सरिता मेश्राम-कुलकर्णी, कल्पना बंसोड, स्नेहा गडपायले, दीपा शहारे, संध्या यादव, नेहा यादव, अभय अग्रवाल, रूपेश नशिने, संगीता गुप्ता, प्रदीप माने, सीमा कवास, संतोष पटले, बेबिनंदा बंसोड, अनुज जायस्वाल, दुर्गा तिवारी, प्रगती गहरवार, राजीव आसवानी, प्रीती वालदे, शिखा सोनपुरे यांचा समावेश आहे. यातील काहींनी दिग्गजांना धक्का देऊन नगर परिषदेतून बाहेर केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *