LatestNewsगोंदियाविदर्भ

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार येथे इयत्ता 6 ते 9 वर्गात प्रवेशपूर्व परीक्षा

गोंदिया  : वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, बोरगाव बाजार (ता.देवरी) येथे प्रवेश देण्याबाबतची योजना सुरु आहे. वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावीच्या CBSC तसेच इयत्ता सातवी व नववीचे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या CBSC एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, बोरगाव बाजार (ता.देवरी) येथे प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सर्व जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा व इतर मान्यता प्राप्त प्राथमिक/ माध्यमिक शाळेतील वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गात शिकत असलेले, परंतू ज्या पालकाचे उत्पन्न रुपये 6 लाखापेक्षा कमी आहे, अशाच पालकांचे अनुसूचित/आदिम जमातीचे विद्यार्थी हे सदर स्पर्धा परीक्षेस बसण्यास पात्र राहतील.
सदर स्पर्धा परीक्षा दिनाक 1 मार्च 2026 रोजी वर्ग सहावीची सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत तसेच वर्ग सातवी ते नववीची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत या कार्यालयामार्फत ठरविलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. इयत्ता पाचवीचे परीक्षा प्रवेश अर्ज दिनांक 25 जानेवारी 2026 या अंतिम तारखेपर्यंत तसेच इयत्ता सहावी ते नववी प्रवेश परीक्षा अर्ज दिनांक 30 जानेवारी 2026 या अंतिम तारखेपर्यंत प्राचार्य/ मुख्याध्यापक यांचेमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी या कार्यायलात कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
सदर परीक्षेचे अर्ज प्रकल्प देवरी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, बोरगाव बाजार (ता.देवरी) येथे उपलब्ध असतील. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, नमूद उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या/ पालकांच्या पाल्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेश देता येणार नाही व पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, जातीचा दाखला, मुलांचा आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, अपंग असल्यास अपंगत्याचा दाखला, इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशाकरीता पाचवी प्रथम सत्रात गुणपत्रिका, इयत्ता सातवी वर्गाच्या प्रवेशाकरीता इयत्ता सहावी पासची गुणपत्रिका, इयत्ता आठवी वर्गाच्या प्रवेशाकरीता सातवी पासची गुणपत्रिका, इयत्ता नववी वर्गाच्या प्रवेशाकरीता आठवी पासची गुणपत्रिका इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहीतीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिचगड रोड, देवरी तसेच प्राचार्य, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव बाजार (ता.देवरी) यांचेकडे दि. 25 जानेवारी 2026 पूर्वी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 07199-251444 आहे. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी कळविले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *