Deepdan Utsav: ‘दीपदान महोत्सव’ कोरणी घाट सहस्र दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार
खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती
गोंदिया : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आध्यात्मिक चैतन्याला आज एका दैवी सोहळ्याची जोड मिळणार आहे. निमित्त आहे. वैनगंगेच्या पवित्र तीरावरील कोरणी घाट येथे (Deepdan Utsav) आयोजित करण्यात आलेल्या भव्य दीपदान महोत्सवाचेः विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित हा सोहळा आज सायंकाळी ७:३० वाजता वृंदावन सिद्धपीठाचे सदुरु श्री कतेश्वरजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि त्यांच्याच शुभहस्ते संपत्र होणार आहे.

‘दीपदान हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा सोहळा आज गोंदियाकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभूती ठरणार आहे. कोरणी घाटावर जेव्हा शेकड़ों दीप एकाच वेळी प्रज्वलित केले जातील, तेव्हा चैनगंगेच्या संथ पात्रात पहाणारे दिव्यांचे प्रतिबिंब जणू आकाशातील नक्षत्रांनी पृथ्वीवर अवतरल्याचा मास निर्माण करेल. हा केवळ एक कार्यक्रम नसून, मातीर, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा महाकुंभ (Deepdan Utsav) असेल. या भक्ती सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांची उपस्थिती. त्यांच्या आशीर्वादाने आणि दिव्य वाणीने आधीच गोंदियाचे वातावरण भक्तीमय झाले आहे. त्यात आता या दीपदान महोत्सवाची (Deepdan Utsav) भर पडणार आहे. या पवित्र प्रसंगी जिल्ह्याचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षाताई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत, खासदार पटेल यांच्या पुढाकारातून शहरात सुरु असलेल्या आध्यात्मिक उपक्रमांमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने या महोत्सवासाठी (Deepdan Utsav) जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती देताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सचिव केतन तूरकर म्हणाले की, “सद्धरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा दीपदान महोत्सव गोंदियाकरांसाठी एक दुर्मिळ आध्यात्मिक पर्वणी आहे. वैनगंगेच्या तीरावरील हे विलोभनीय दृश्य आणि महाराजांचे सानिध्य प्रत्येकाला एक नवी ऊर्जा देऊन जाईल. तरी सर्व भाविक भक्तगणांनी आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह या हृदयस्पर्शी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे”
कोरणी घाटाची स्वच्छता, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भाविकांना बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था यामुळे घाटाचे रूप पालटून गेले आहे. सायंकाळी ७:३० वाजता प्रत्यक्ष दीपदानाला
सुरुवात होईल. यावेळी होणारे मंत्रोच्चार आणि शंखनाद यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघेल. सगुरु ऋतेश्वर महाराज म्हणतात की, दीपदान है केवळ दिवा लावणे नसून आपल्या अंतर्मनातील अज्ञानाचा अंधार दूर करणे होय. (Deepdan Utsav) या महोत्सवाच्या माध्यमातून गोंदियाच्या जनतेला एक नवी आध्यात्मिक ऊर्जा मिळणार आहे. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून अशा सामूहिक धार्मिक सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते, अशी भावना भाविकांमधून व्यक्तहोत आहे. आयोजन समितीच्या वतीने सर्व गोंदिया करूंना आणि परिसरातील भाविकांना कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे की, या हृदयस्पर्शी आणि ऐतिहासिक (Deepdan Utsav) धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. ही एक दुर्मिळ आध्यात्मिक पर्वणी असून, वैनगंगेच्या तीरावर होणारा हा दीपोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर ट्रस्टने स्वयंसेवक देखील तैनात केले आहेत.

