समर्पित व्हा, पक्षनिष्ठतेचा फळ मिळतो-जि.प.अध्यक्ष भेंडारकर
भाजपा अर्जुनी मोरगाव,केशोरी मंडळाची विस्तारित बैठक संपन्न.
अर्जुनी मोरगाव : भारतीय जनता पार्टी विचारांवर चालणारी पार्टी आहे.पक्षात घराणे शाहीला थारा नाही. संघटनेत कार्यकर्त्याला महत्त्वाचे स्थान आहे.हे कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विश्वातील सर्वात मोठी पार्टी म्हणून मान मिळाला.तळागाळातील कार्यकर्ता प्रवाहात यावा म्हणून केंद्रीय नेतृत्व विविध अभियान राबवत आहे.पक्ष आणि संघटनेमुळे कार्यकर्ता मोठा होतो.एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संघटनेच्या मोठ्या जबाबदाऱ्या दिला जातात.देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. संघटनेचे ध्येय धोरण, विचारधारेला समर्पित होऊन कार्य करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याचा भाजपा सन्मान करून त्याला योग्य फळ देते असे विचार जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मांडले.
ते भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोरगाव आणि केसोरी मंडळाच्या विस्तारित बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्ष सीताताई रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले,प्रदेश महामंत्री रचना गहाणे,मंडळ अध्यक्ष राधेश्याम भेंडारकर, मंडळ अध्यक्ष प्रकाश गहाणे, जि प सदस्य जयश्री देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विजय कापगते,लक्ष्मीकांत धानगाये, संजय बारेवार,खरेदी विक्री सभापती केवळराम पुस्तोडे, उपसभापती संदीप कापगते,राज्य परिषद सदस्य डॉ. गजानन डोंगरवार, शिवनारायण पालीवाल, प्रदेश सदस्य चामेश्वर गहाणे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष रहांगडाले यांनी रक्षाबंधन कार्यक्रम, विभाजन विभिशीका दिवस,हर घर तिरंगा अभियान घरापर्यंत पोहचवा.आगामी निवडणुकामध्ये 51 टक्के मते मिळविण्यासाठी एकसंघ व्हा.केंद्र आणी राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ शेवटच्या घटकाला मिळवून द्या.ऑपरेशन सिंदूर ने जगाला भारताची ताकत कळली.2047 च्या विकसित भारताच्या पायाभरणीत आपले योगदान देण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.यावेळी रचना गहाने, पंकज रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.अर्जुनी मोरगाव आणि केशोरी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा मंडळ अध्यक्षांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गहाणे, संचालन ओमप्रकाशसिंह पवार आणि आभार राधेश्याम भेडारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंत्री लैलेश्वर शिवणकर, जयंत लांजेवार, भोजराज लोगडे, प्राणगोपाल दास, मुकेश जयस्वाल,पोमेश रामटेके,पराग कापगते, अश्विन गौतम,उमेश तवाडे, गीता ब्राह्मणकर,मीना शहारे, वनिता नशिने,मिनती सरकार, खोकन सरकार, गौरीशंकर अवचटे, काशिनाथ कापसे, मुरलीधर ठाकरे, रामदास कोहाडकर यांनी सहकार्य केले.

