LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

Jungle Safari : चितमपल्लीची निसर्गशाळा” निसर्ग शिक्षण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने (Jungle Safari) “चितमपल्लीची निसर्गशाळा हा निसर्ग शिक्षण उपक्रम विद्यार्थी, शिक्षक यांच्यात वन्यजीव आणि जंगलाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यांना संवर्धन उपक्रमामध्ये सहभागी करुन घेण्यास प्रोत्साहीत करुन निसर्गाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्याकरीता बफर क्षेत्रातील निवडक 16 जिल्हा परिषद शाळांमध्ये ऑक्टोबर 2025 पासून सुरु करण्यात आला आहे. यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची ओळख, मानव-वन्यजीव सह अस्तित्व, सस्तन प्राणी व खुणा, जंगल सफारी (तयारी), पक्षी व जलक्षेत्र, वन्यजीव जागरुकता इ. विविध विषयांवर वनअध्यापक आणि स्थानिक NGO सेव्ह इको सिस्टीम अॅन्ड टायगर, हिरवळ संस्था, गोंदिया निसर्ग मंडल, यांचेमार्फत दर महिन्याला वर्गातील सत्रे आणि प्रात्यक्षिक याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
याच उपक्रमाचा एक भाग असलेल्या जंगल सफारीची (Jungle Safari) सुरुवात श्री.प्रितमसिंग कोडापे उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली यांच्याहस्ते उपस्थित सर्पवाडा येथील उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेतील 30 विद्यार्थी व शिक्षकांना (Jungle Safari) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि जंगल सफारी बहल मार्गदर्शन करुन दिनांक 19/12/2025 रोजी कोका   वन्यजीव अभयारण्यातील चंद्रपुर वनपर्यटन गेट येथून करण्यात आली. सफारी दरम्यान अस्वल, बिबट, मोर आणि विविध प्रकारचे पक्षी दिसल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांनी समाधान व्यक्त करुन व्याघ्र प्रकल्पाचे आभार मानले. यावेळी सुहास कांबळे सहायक वनसंरक्षक, कोका, श्री. सुरज गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका, कु. दामिनी भगत, संवर्धन तज्ञ नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सेव्ह इको सिस्टीम अॅन्ड टायगर या संस्थेचे प्रतिनीधी श्री. नाहीद परवेज, श्री. दिनेश देशमुख, श्री. नितांत मोहतुरे व कोका वन्यजीव अभयारण्यातील क्षेत्रीय वन कर्मचारी हजर होते. सफारीची सांगता अल्पोहाराने करण्यात आली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *