भाकप भंडारा तालुका बैठकीत शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : कॉम्रेड हिवराज उके
भंडारा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा तालुका कौन्सिलची बैठक दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड माणिकराव कुकळकर यांच्या अध्यक्षतेखाली व भाकप चे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके, कॉम्रेड वामनराव चांदेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
सर्वप्रथम कॉम्रेड अमृत महाजन जळगाव व ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव पुणे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत भाकपला 26 डिसेंबर 2025 रोजी 100 वर्षे पूर्ण होत असल्याने “शताब्दी वर्ष-वर्धापन दिन” साजरा करण्यासाठी पूर्वतयारी निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे निर्णय करण्यात आले.- यात पक्ष कार्यालय रंगरंगोटी-लाइटिंग करून सजवणे, ध्वजारोहण करणे तत्पूर्वी गांधी चौक भंडारा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून मार्क्सवाद-लेनिनवाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबादच्या घोषणा देत सायकल-मोटरसायकल रॅली ने पक्ष कार्यालय राणा भवन, लाला लजपतराय वार्ड भंडारा येथे येऊन पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या हस्ते पक्षाच्या लाल ध्वजाचे ध्वजारोहण करणे, झेंडा गीत सादर करणे, कार्यालयात सभेचे आयोजन करणे, पक्षाच्या शंभर वर्षाच्या संघर्ष, त्याग, बलिदान व उपलब्धींची माहिती देणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे स्वागत-सत्कार करणे, पक्ष प्रतिज्ञा घेणे, पक्ष सभासदत्वाचे नूतनीकरण करणाऱ्यांना पक्षाचे कार्ड देणे. विकत घेणाऱ्यांना पक्षाचे कॅलेंडर वितरण करणे आणि 7 जानेवारी पूर्वी शाखा बैठका घेऊन सभासदांचे नूतनीकरण व त्यानंतर नवीन सभासद नोंदणी करणे इत्यादी संबंधीचे मार्गदर्शन कॉम्रेड हिवराज उके यांनी केले. संचालन पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर महिला कार्यकर्त्या कॉम्रेड सरस्वता देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत उपस्थितांचे आभार मानले. सभेला प्रामुख्याने सर्वकॉम्रेड दीपक गजभिये, गौतम भोयर, जयदेव सोनकुसरे, प्रताप डोंगरे, सोपान माकडे, आशिष वंजारी,उषा कुमारी सूर्यवंशी, छबी पाचे,गोपाल चोपकर, घनश्याम नागोसे,गणेश क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.

