LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Sickle cell disease (SCD) : लग्नापुर्वी ठेवा मनी सिकलसेलची तपासणी :  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे

जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहचे उद्घाटन कार्यक्रम के.टी.एस.रुग्णालयात संपन्न
गोंदिया : 
सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजाग्रुती होण्याच्या दृष्टिने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि.11 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर दि.11 डिसेंबर रोजी के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बाल रोग तज्ञ डॉ.माधुरी धांडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे (भगत), वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, सिकलसेल कार्यक्रम प्रमुख डॉ.सोनल मेश्राम यांचे उपस्थितीत संपन्न झाला..सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी मातेचे पुजन व माल्यार्पण करुन करण्यात आले.
(Sickle cell disease (SCD)) सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे.या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे.सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत तपासणी करण्याचे आवाहन डॉ.माधुरी धांडे यांनी याप्रसंगी केले आहे. सामान्य लाल रक्त पेशी या गोलाकार व लवचिक असतात तर सिकलसेल लाल रक्त पेशी ह्या विळाच्या आकाराच्या असतात. तसेच त्या कडक असतात. सिकलसेल रुग्णांना अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, डोळे पिवळसर होणे, असह्य वेदना होणे,लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे असे विविध लक्षणे आढ्ळुन येत असतात. लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घेण्याचे आवाहन ह्याप्रसंसंगी करण्यात आले. लोकांनी जागरुकपणे असे विवाह टाळले पाहीजे ज्यात दोघेही वाहक असतील, एक वाहक व एक ग्रस्त असेल तर तसेच दोघेही ग्रस्त असतील तर कारण त्यामुळे आपल्या परिवारात होणाऱ्या अपत्याला सिकलसेल हा आजार होऊ शकतो.सिकलसेल हा आजार संसर्गजन्य नसल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी याप्रसंगी केले.
जिल्हयात सद्य स्थितीत ह्या आर्थिक वर्षात सिकलसेल ग्रस्त रुग्ण(एस.एस) 184 तर सिकलसेल वाहक (ए.एस) 1699 रुग्ण आढळुन आलेले आहे.सदर रुग्णास शासनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. शासकीय रुग्णालयात सिकलसेल ग्रस्त गरोदर मातांची गर्भजल तपासणी करुन होणारे बाळ सिकलसेल ग्रस्त आहे किंवा कसे है निदान करून गर्भपाताचा सल्ला देण्यात येत असल्याची माहीती सिकलसेल कार्यक्रम प्रमुख डॉ.सोनल मेश्राम यांनी ह्याप्रसंगी दिली आहे. सिकलसेल कार्यक्रमासंबंधी आवश्यक माहिती ह्या प्रसंगी देऊन आजाराविषयी जनजागृती करण्यात आली जनतेला आव्हान करण्यात आले की मुलगी अथवा मुलगा यांच्या लग्नापुर्वी सिकलेसल आजार तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरुन आजाराचा प्रसार थाबंविणे शक्य होईल.
सिकलसेल सप्ताह शुभारंभ कार्यक्रमाचे संचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेन्द्र पारधी व आभार प्रदर्शन सिकलसेल समुपदेशक निशा डहाके, यांनी केले. कार्यक्रमात अधिपरिचारिका बिसेन,निकिता शरनागत,ललिता शरनागत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भुषण भेंडारकर, पी.पी.तागडे, निशांत बन्सोड,मनिष मदने,राजेन्द्र लिल्हारे,दिलिप ब्राम्हणकर,अजित सिंग, यांचे सह के.टि.एस.रुग्णालय व सिकलसेल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *