ST BUS Karmachari : पाच हजार कर्मचार्यांचा हंगामी वेतन श्रेणीचा प्रश्न ऐरणीवर
सहा वर्षापासून आर्थिक पिळवणूक
गोंदिया : परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पद काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले. पदातील कर्मचार्यांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदाचा अतिरिक्त कर्मचारी झाले. याचा फटका ST BUS Karmachari चालक व वाहक या दोन्ही पदातील ५ हजार कर्मचार्यांना बसला शासनाची मंजुरी नसल्याने अनेक चालक व वाहकांना सहा वर्षापासून हंगामी वेतनश्रेणीत काम करावे लागत आहे. परिणामी आर्थिक पिळवणूक होत अहे.
सन २०१६मध्ये ‘वाहक’ पद गोठविण्यात आले. चालक तथा वाहक हे नवीन पद निर्माण केले आहे. नवीन पद निर्माण करण्यात आल्यानंतर ते चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आले. हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचार्यांचे नाव जेष्ठता सूचितही खाली टाकले जाते.
नोकरीत तीन वर्ष पूर्ण झाल्यावरच बढती परीक्षेस पात्र ठरविण्यात येते. त्यामुळे यांच्यापेक्षा नवीन भरती झालेले ST BUS Karmachari कनिष्ठ कर्मचारी बढती परीक्षेस पात्र ठरतात. हंगामी वेतन श्रेणीतील कर्मचार्यांना बढती उशिरा मिळाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होते. भविष्यातील विविध लाभांनाही त्यांना मुकावे लागते.
……….
वाहकांची ३ हजार ७३० पदे रिक्त
महामंडळात संपूर्ण राज्यभरात ST BUS Karmachari वाहक पदाची ३ हजार ७३० पदे आजही रिक्त आहेत. चालक व वाहक व चालक तथा वाहक ही पदे एकत्रित मंजूर करून ५ हजार हंगामी वेतन श्रेणीच्या कर्मचार्यांना भविष्यात उपपदालाही मुकावे लागू शकते. शिवाय, त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही. नोकरीच्या हमीबाबतही साशंकता असते. त्यामुळे हंगामी वेतनश्रेणीच्या कर्मचार्यां संदर्भात सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.

