LatestNewsविदर्भ

Janmashtami utsav: कुष्णनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

माजी खासदार नेते व सौ.अर्चना नेते यांनी केली पूजा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर येथील इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने, धार्मिक विधी आणि भजन-कीर्तनांच्या गजरात साजरा करण्यात आला. या पवित्र सोहळ्यास माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे आपल्या सौभाग्यवती सौ. अर्चना नेते यांच्यासह उपस्थित राहून सहभागी झाले.

मध्यरात्री बरोबर भगवान श्रीकृष्णाचा जन्म पारंपरिक विधीनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “हरे कृष्ण… हरे कृष्ण” अशा गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय पूजाअर्चा, नामस्मरण आणि कीर्तनामुळे वातावरण दैवी व आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. या प्रसंगी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करताना सांगितले की :”या पावन जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो. समाजात सत्य, धर्म आणि सद्गुणांचे पालन व्हावे, हीच माझी मनोकामना आहे. या जन्मोत्सवात ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,इस्कॉन मंदिरचे परमेश्वर दास,राम सरकार जी, व्याहाड चे सामाजिक नेते प्रमोदभाऊ बोमनवार, तसेच असंख्य भाविक मोठ्या श्रद्धा व उत्साहाने सहभागी झाले. या जन्माष्टमी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर आनंद, भक्ती आणि उत्साहाने उजळून निघाला. दरम्यान, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गडचिरोली शहरातही उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा सचिव सौ. लक्ष्मी ताई कलंत्री व भाजपाचे युवा नेते मंगेश रणदिवे यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी पूजाअर्चा व दर्शन घेतले व सर्वांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मनोकामना केली. जन्माष्टमी उत्सवामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा माहोल निर्माण झाला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *