LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Drone pilot training : सोलर व ड्रोन पायलट प्रशिक्षणाचे आयोजन

गोंदिया : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील युवक, महिला व स्वयंरोजगार इच्छुकांसाठी सौर ऊर्जा (Solar Installation) प्रशिक्षण व ड्रोन पायलट प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. (Drone pilot training) सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञान युगात सौर ऊर्जा व ड्रोन तंत्रज्ञानाला मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणाद्वारे सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कार्यानुभव, तांत्रिक ज्ञान तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा या संस्थेचा उद्देश आहे. प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये : अनुभवी व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण, शासन व खाजगी क्षेत्रातील रोजगार संधीबाबत माहिती, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणासाठी पात्रता 8 वी पास ते पदवीधर पर्यंत. वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे. महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल. (Drone pilot training) अपेक्षीत लाभ : सौर ऊर्जा प्रकल्पात रोजगार व स्वयंरोजगार, ड्रोन पायलट म्हणून करिअरच्या संधी. आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य. सदर प्रशिक्षण गोंदिया जिल्ह्यातील युवक व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीकरीता इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक (अमृत) कार्तिक तिवारी भ्रमणध्वनी क्र.9112228776 यावर संपर्क साधावा.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *