LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

लाखांदुरात कडकडीत बंद; चिमुकलीवरील अतिप्रसंगाविरोधात संतप्त पडसाद

विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लाखांदूर :
गत ९ दिवसांपूर्वी शहरात ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीयाकडून झालेल्या अतिप्रसंगाविरोधात लाखांदूर पेटून उठला असून त्या प्रसंगाविरोधात १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय नागरीकांकडून लाखांदूर बंदसह मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याच्या सुरुवातीलाच शिवाजी टी पॉइंट येथे उपस्थित गर्दीला संबोधताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लाखांदूर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद संपुष्टात आणून पुढे या मोर्चाचे प्रस्तान झाले. आणि सर्वाशेवटी चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात सर्वधर्मीय नागरिकांकडून काही मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर एका विधिसंघरशित परप्रांतियाने अतिप्रसंग केला. त्याचे विरोधात लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली असली तरी ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे, या घटनेच्या आणि या प्रसंगाच्या विरोधात लाखांदूर पेटून उठला. याच्या निषेधार्थ आणि काही मागण्या घेवून १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय लाखांदूर बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
निवेदनातून केलेल्या मागण्या..
विधिग्रस्त आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातुन हाकलण्यात यावे व यापूर्वी देखील त्यानी केलेल्या गुन्ह्याच्या संबंधाने तपास करावा. पीडित व तिच्या कुटुंबायाला संरक्षण देण्यात यावे. विधिग्रस्त आरोपी बालक हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याची जमानत होऊ देऊ नये म्हणून जलद गती न्यायालयात सदर प्रकरण चालवावे. व शिक्षा होण्या संबंधाने आवश्यक ती कार्यवाही करावी. विधिग्रस्त आरोपीच्या कुटूंबाचे रहिवासी, आधार व राशन कार्ड हे बेकायदेशिर तयार करण्यात आले ते तात्काळ रद्द करण्यात यावे. व सदर कागदपत्रे तयार करुण देणार्‍या लोकप्रतिनीधीवर कार्यवाही करण्यात यावी. पीडित कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची व शासकीय नोकरी देण्यात यावी. रोजगार करणार्‍या व सामान विकणार्‍या व्यक्तींची मुशाफरी पोलिसांनी नोंदविण्यात यावी व त्यांची नोंद घ्यावी. ज्या परप्रांतीयांचा लाखांदूरात वावर आहे त्यांची मुळ रहिवासी व अन्य कागदपत्रे मागवून त्यांची माहिती पोलीस स्टेशन ला अद्यावत ठेवावी. व हे बांगलादेशी किंवा रोहीग्यां आहेत काय? याची शहानिशा व्हावी. परप्रांतीयांना शह देणार्‍याची चौकशी करण्यात यावी. व परप्रांतीयांना लाखांदूर शहरात घर भाड्याणे देण्या अगोदर त्याची माहिती पोलीसांना देण्यात यावी. लाखांदूर शहरातील फुटपाथवर परप्रांतीयांची असलेल्या दुकानांची चौकशी करण्यात यावी. परप्रांतीयांचे रहिवासी दाखले व इतर शासकिय कागदपत्रे तयार करण्यात येऊ नये यासाठी बंदी घालावी. आदी मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाच्या नेत्या लोकप्रतिनिधींनी हिरीरीने सहभाग नोंदविला. हे मात्र विशेष.
शहरातील मुस्लिम संघटनेचा मोर्चाला पाठिंबा आणि निवेदन..!
गत ६ डिसेंबर रोजी लाखांदूर येथे एका ५ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अतिप्रंगाविरोधात लाखांदूरात सर्धर्मीय नागरिकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला स्थानिक लाखांदूर शहरातील जामा मशीद, अरबी मदरसा व कबरस्थान व्यवस्थापन समितीने निवेदनातून जाहीर पाठिंबा दिला असून काही मागण्यांचे निवेदन पण सादर केले. पीडितेला तात्काळ व निष्पक्ष न्याय मिळावा, दोर्षीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. समाजात भीती नव्हे तर न्याय व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे.(ता.प्र.)

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *