311645 घरापर्यंत पोहचुन 1394114 लोकांची तपासणी
162 कुष्ठरुग्णांना शोधुन मोफत औषधोपचार
आरोग्य विभागाने कुष्ठरोग शोध अभियानात
गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाच्या वतीने दि.17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यांमधील गावोगावी व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांचे मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय व वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे यांचे प्रत्यक्ष कार्यवाहीत कुष्ठरोग शोध मोहीम संपन्न झाली.सदर मोहिमे अंतर्गत 162 छुपे कुष्ठरुग्ण शोधुन त्याना मोफत औषधोपचार मिळण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहीती डॉ.महेंद्र धनविजय यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील एकुण 13 लाख 94 हजार 114 लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन एकूण 1023 गावामध्ये सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले.यंदाच्या अभियानात 3 लाख 11 हजार 645 घरे सर्वेक्षणासाठी निवडली होती त्यासाठी 1271 पथके आणि 253 पर्यवेक्षक मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले होते.त्याकरीता 2542 पथक कर्मचारी यांनी कुष्ठरोग तपासणी व जनजागृती केल्यात मोलाचे कामगिरी पुर्ण केल्याची माहिती सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र धनविजय यांनी दिली आहे. कुष्ठरोग शोध अभियान दि.17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत 7433 संशयित कुष्ठरुग्ण संशयितांची तपासणी पुर्ण करण्यात आली असुन तपासणी अंती निदान झालेले 162 कुष्ठरुग्णाना मोफत व घरपोच औषधोपचार सुरु करण्यात आले आहे.त्यापैकी पिबी प्रकाराचे 99 व एमबी प्रकाराचे 63 रुग्ण आढळले आहे.त्यात 3 बालके आढ्ळुन आले आहे. 162 कुष्ठरुग्णांन मध्ये 83 पुरुष व 79 महिलां असल्याची माहीती कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे यांनी दिली आहे.

