Local Body Elections 2025 Dates : नागरी संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला; २ डिसेंबरला मतदान
निवडणूक कार्यक्रम जाहिर : राजकीय हालचाली गतिमान
गोंदिया : मागील महिनाभरापासून नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कामे गतिमान असल्याने निवणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. त्यातच आज (ता.४) राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Local Body Elections 2025 Dates) जाहिर केला आहे. यामुळे मागील ४ वर्षांपासून असलेली प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व सालेकसा या चारही नागरी संस्थांमध्ये राजकीय हालचालींना सुरूवात झाली आहे.
(Local Body Elections 2025 Dates) नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुरूप स्थानिक निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. ओबीसी आरक्षण कायम ठेवून आगामी निवडणूका घ्याव्यात, अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मतदार यादी प्रसिध्दी, नविन प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचे कामे आटोपले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. Local Body Elections 2025 Dates त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसर्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषद तर सालेकसा व गोरेगाव या दोन नगरपंचायतीत मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच इच्छूकांसह राजकीय पक्षाचे पुढारी कामाला लागले असून निवडणुकीला घेवून मोर्चेबांधणी केली जात आहे. यामुळे नागरी क्षेत्रात राजकीय घडमोंडीना वेग आले आहे.
————-
असा राहणार निवडणूक कार्यक्रम ( Local Body Elections 2025 Dates)
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५अर्जाची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५मतदान – २ डिसेंबर २०२५मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५निकाल जाहीर करण्याचा दिवस ३ डिसेंबर २०२५
————–
मतदारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल अॅप
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र त्याचबरोबर मोबाईल अॅपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.——————-उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवली!या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

