LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

International Human Rights Day : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रम संपन्न

भंडारा : कारागृहातील बद्यांना विविध मानवी हक्कांची माहिती व संरक्षणाबाबत जाणीव जागृती होण्याकरीता, मा. मुख्य न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार व मा. अध्यक्ष माहाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या आदेशानुसार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस, (International Human Rights Day) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करुन, उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन, कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती लिना फलके, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, काळे  उपविभागीय अधिकारी भंडारा,  मिलिदकुमार विः बुराडे वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, इ. प्रमुख पाहुण्यांचे डी. एस. आहे अधिक्षक, भंडारा जिल्हा कारागृह, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अॅड. गभणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, यांनो कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. त्यांनतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  काळे साहेब, उपविभागीय अधिकारी भंडारा य  मिलिदकुमार वि. बुराडे वरिष्ठ न्यायाधीश भंडारा यांनी बद्यांना असणाऱ्या विविध (International Human Rights Day)  मानवी हक्कांबाबत माहिती दिली तसेच हक्कांचे संरक्षणाकरीता कोणते फायदे करण्यात आले याबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले. तसेच अड. श्रीमती तुरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांनी आपल्या भाषणातून कैद्यांच्या मानवी हक्कांची जाणीव जागृती करुन बंद्यांना जगण्याचा अधिकार जिवीताचो सुरक्षा, कायदेविषयक मदत याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती लिना फलके, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, यांनी अध्यक्षीय भाषणातून बंद्यांना कारागृहात शिस्तीचे वर्तन व कायद्यांच्या नियमाचे पालन करण्याबाचत उत्तम मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाची सांगता  डी. एस आहे, अधिक्षक भंडारा जिल्हा कारागृह यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमास 315 बंदी उपस्थित असून, कारागृह अधिकारी व कर्मचारी श्री. चम्हा चोपकर, तु.अ. श्रेणी-2, श्री. अनिल मुळे तु.अ. श्रेणी-2, तसेच कारागृह कर्मचारी यांनी कार्यक्रम दरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख सांभाळली. तसेच सदर कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्रतिनिधी भंडारा व गोंदिया पेचिल प्रतिनिधी यांनी उपस्थिती दर्शवीलो.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *