winter migratory birds : नवेगावबांध परिसरात विदेशी पक्षांचे आगमन; पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू.
अर्जुनी मोरगांव (गोंदिया ) : नवेगावबांध जलाशय व परिसरातील तलाव पुन्हा एकदा पक्षीप्रेमी, पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. (winter migratory birds ) तलाव परिसरात या दुर्मिळ हिवाळी परदेशी पक्ष्यांचे थवे दिसू लागले असून, त्यांच्या दर्शनाने पक्षीप्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे.अर्जुनी मोरगाव तहसीलच्या प्रत्येक मोठ्या तलावात हिवाळ्यात मोठ्या संख्येत विदेशी पाणपक्षी दरवर्षी येत असतात . (winter migratory birds ) गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . येथे प्रत्येक तहसील मध्ये बहुसंख्येत तलाव आहेत. येथील जलाशय व परिसरातील तलाव हे निसर्गरम्य आणि शांत परिसर असून, विविध पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो.नवेगावबांध येथील जलाशय हे ४५० वर्षापूर्वीचे फक्त सिंचनासाठी बांधण्यात आलेले मालगुजारी जलाशय आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील नवेगावबांध हा तलाव कोलु पाटील डोंगरवार या व्यक्तीच्या दुरदृष्टी, अथक प्रयत्न आणि कौशल्यातुन उभा झालेला आहे.या तलावाचे पाणलोट क्षेत्र ५६.९८ चौ. कि. मी. तर संचय क्षमता ४५.९४३ द.ल.घ.मी.असून हा तलाव ६४ हजार रुपयात १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात १००० हेक्टर धान आणि ऊसाच्या सिंचनासाठी बांधण्यात आला.मुख्य बांधाची लांबी ६२५ मीटर आणि उंची ११.५८ मीटर आहे. मुख्य धरणाचे मातीकाम ७००० घनमीटर तर उपबांधाचे मातीकाम ४०-३९८ घनमीटर केलेले होते.तलावाच्या १०३४ हेक्टर बुडीत क्षेत्रात त्याकाळी राजी, गंफी, बामणी, अंजनगाव, रिती, कोहळीटीला. मालडोंगरी आणि रांजीटोला अशी ७ गावे होती. सिंचनासाठी तलावापासून दोन कालवे काढण्यात आले होते. (winter migratory birds ) नवेगावबांध, मुंगली, देवलगांव, येरंडी व खोली हया पाच गावातील १००० हेक्टर क्षेत्राला सिंचन होत आहे. जास्तीच्या पाण्यासाठी ८७ मीटर लांबीचा सांडवा तयार करण्यात आला होता.कोलु पाटील यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांच्या समर्थनार्थ लोक त्यांना कोलासुर देवं म्हणतात आणि त्यांची समाधी मालडोंगरी या टेकडीवर आहे.
(winter migratory birds ) या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ग्रेलेक गुग्स, कॉमन पोचार्ड, रेड क्रिस्टेड पोचाई, मलाई, गारगनी, आर्कटिक टर्न, सायबेरियन सारस, ब्लेक टेल्ड गॉडविट, कॉमन दिल, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क,पॅटेट स्टार्क, कारमोरंट, परंपल मोरहेन, ब्लॅक हेड, ब्लॅक हेड आंबिस, व्हाईट ब्रेस्ट वॉटरहेन, ग्रे हेरान, लेसर विंग इक या विदेशी पक्षाबरोबरच हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे परदेशी पाहुणे पूर्व विदर्भातील जलाशयावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. हिमालयाशिवाय युरोपियन देश सायबेरिया येथून सुमारे १० हजार किलोमीटरचा प्रवास करून नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्या पर्यंत या पक्ष्यांचे येथे आगमन होते.या तर त्यांचा परतीचा प्रवास हा वसंत पंचमी म्हणजे फेब्रुवारी-मार्च एप्रिल महिन्याच्या अखेरीस होतो.
यंदा पाण्याची पातळी उत्तम राहिली आहे. तलावाभोवतीची झाडी,शांत वातावरण आणि उंच झाडे यामुळे हा परिसर (winter migratory birds ) स्थलांतरित पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास ठरतो.असे अनेक दिशातून येणारे विदेशी पक्षी या हंगामातील आकर्षण असते. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आणि आग्नेय आशियातून भारतात स्थलांतरित होतात.परंतु यंदा अतिवृष्टीमुळे या पक्षांचे आगमन उशिरा झाले आहे. या दुर्मिळ परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे तालुक्यातील निसर्गप्रमी, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

