पोलीस मुख्यालय येथे जीवनशैली निरोगी ठेवण्याकरिता संतुलित आहार संबंधाने कार्यशाळेचे आयोजन
गोंदिया : पोलीस दलातील रोजच्या कामातील व्यस्ततेमुळे पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्यावर मोठया प्रमाणात मानसिक ताणतणाव येत असतो. त्याचा परिणाम त्यांचे शारिरीक, मानसिक आरोग्यावर तसेच पारिवारीक जीवन व कामकाजाचे ठिकाणी दिसून येतो, शरीर निरोगी राहण्याकरिता योग्य आहार, स्वस्थ जीवनशैली आणि मनाची अवस्था या गोष्टी आवश्यक असुन निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहाराची महत्वाची भुमिका आहे. संतुलीत आहारामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य सुधारते आणि मधुमेह व हृदयरोग यासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होती, शरीर निरोगी राहावे या संकल्पनेतुन पोलीस अधिकारी/अंमलदारांकरिता पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १२/१२/२०२५ रोजी पोलीस मुख्यालय गोंदिया येथे *”जीवनशैली निरोगी ठेवण्याकरिता संतुलित आहार”* या विषयावर कायशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक *आहारतज्ञ अमिता यज्ञेश्वर पिल्लेवान, के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया व आहारतज्ञ कोमल रमाकांत अवस्थी, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, गोंदिया* यांना राखीव पोलीस निरीक्षक श्री राजेश सरोदे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सदर कार्यशाळेत मार्गदर्शक आहारतज्ञ अमिता यज्ञेश्वर पिल्लेवान, के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया यांनी संबोधित करुन आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व महत्वाची पोषणत्तवे प्राप्त होत नसतात. शरीर निरोगी राहण्याकरिता सर्व पोषक तत्वे जसे की कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर योग्य प्रमाणात देणारा आहार या गोष्टी आवश्यक असुन निरोगी रवारथ्यासाठी अशा सारख्या विविध वस्तूवर गुणधर्माचे फायदे सांगितले जेणेकरुन रक्तदोष, पचन विकार, श्वसन विकार आणि पित्ताशयाचे विकारापासुन दुर होण्यास मदत होत असल्याचे सांगुन उपस्थितांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले. त्यानंतर आहारतज्ञ कोमल रमाकांत अवस्थी, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, गोंदिया यांनी संबोधित करुन हृदयरोग, ब्रेन हमरेज ही प्रमुख आरोग्य समस्या असुन वेगाने पसरत जाणारा रोग आहे. या सारख्या आजारामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्यु पावतात. शरीर निरोगी राहण्याकरिता योग्य आहार व स्वस्थ जीवनशैली या गोष्टी आवश्यक असुन निरोगी स्वास्थ्यासाठी मार्निंग वॉक, योगा व प्राणायाम, व आहारामध्ये ताजी फळे, जीवनसत्वे आणि शरिराला देणारा संतुलित आहार अशा विविध वस्तुवर गुणधर्माचे फायदे संगितले जेणेकरुन रोगप्रतिकार शक्तित वाढ होवुन उर्जेची पातळी वाढते व पचनक्रिया सुधारते असे सांगुन उपस्थितांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले.
सदर कार्यशाळेत जवळपास एकूण ९० च्या संख्येने पोलीस अधिकारी /अंमलदारांनी उपस्थित राहुन कार्यशाळेचा लाभ घेतला. सदर कार्यशाळेचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन पोलीस हवालदार राज वैद्य यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी रापोनि राजेश सरोदे, सहायक फौजदार मुस्तफा सरवर, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा लिओनार्ड मार्टिन, राज वैद्य व पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

