Road Accident : अनियंत्रित वाहन झाडावर आदळले ; पत्नी ठार, पती गंभीर
नवाटोला शिवारातील घटना
देवरी (गोंदिया) : देवरी शहराजवळील नवाटोला शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव Road Accident अनियंत्रित कार झाडावर आदळली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजीची आहे. गीता प्रशांतकुमार श्रीवास्तव (वय ५०) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर प्रशांतकुमार श्रीवास्तव हे गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशांतकुमार श्रीवास्तव हे सेलू पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील बँक ऑफ इंडिया कॉलनीतील रहिवासी श्रीवास्तव दांपत्य नातेवाईकांचे लग्न समारंभ आटपून कार क्र.एम.एच.३३ ए एस १०२० ने दोघेच रायपूर वरून वर्धेला जात असताना सोमवारला दुपारी ३:०० वाजता देवरी जवळील नवाटोला शिवारात भरधाव वेगात कार अनियंत्रित होऊन रस्त्याखालील Road Accident खड्ड्यात झाडाला जावून आदळली. यात प्रशांतकुमार श्रीवास्तव यांची पत्नी गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांत कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. देवरी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी ला रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस हवालदार ग्यानीराम करंजेकर हे करीत आहेत.

