mla vijay rahangdale : गावासाठी पंचायत राज अभियान विकासाचे वरदान : आ.रहांगडाले
तालुकास्तरीय पंचायतराज अभियान कार्यशाळा
तिरोडा : विविध विभागाच्या योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात. सदर योजनाची प्रभावी जलद गतीने अंमलबजावणी करून त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावा. लोकसहभागाची चळवळ निर्माण करून आरोग्य शिक्षण उपयोजिका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाने सुरू केले आहे. यामध्ये जास्तीत जास्त ग्राम पंचायतींनी सहभाग घेवून शासनाच्या उद्देशाला यशस्वी करावे, असे आवाहन आ.विजय रहांगडाले यांनी केले आहे.
अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधी आयोजित राहणार आहे. याची तयारी सुरू झाली असून तिरोडा येथे तालुकास्तरीय पंचायतराज कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना आ.विजय रहांगडाले (mla vijay rahangdale) बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी सभापती तेजराम चौव्हाण, जि.प.सदस्य चत्रभुज बिसेन, उपसभापती सुनंदा पटले, हुपराज जमईवार, कुंता पटले, जयप्रकाश पटले, विजय बिनझाडे, वनीता भांडारकर, पर्मिला भलावि, ज्योती सरनागत, कविता सोनेवाने, चेतलाल भगत, दीपाली टेंभेकर, रिता पटले, जिन्टेद्र चौधरी, गट विकास अधिकारी संगमित्रा कोहले, सहायक गट विकास अधिकारी अरुण गिरर्हेपुंजे, सर्व अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक बीडीओ संघमित्रा कोल्हे यांनी केले. यानंतर जि.प.सदस्य चत्रभुज बिसेन, सभापती तेजराम चव्हाण, हुपराज जमईवार, सुनंदा पटले यांनी मार्गदर्शन वेâले. कार्यशाळेला यशदाचे लीलाधर पटले, सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, रोजगार सेवक, सर्व विभाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे तर आभार शितेस पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठा पंचायत समितीचे कर्मचार्यांनी सहकार्य केले.

