Youth4Jobs Foundation : युथ फॉर जॉबने दिला जुनेदला स्वावंलबनाचा आत्मविश्वास
भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या आर्थीक स्वावंलबनासाठी राबविलेल्या कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम म्हणजे युथ फॉर जॉब या संस्थेशी दिव्यांग कल्याण विभागाचा करार होय .त्याव्दारे भंडारा जिल्हयात दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यात आले.
तुमसर जि. भंडारा येथील पदवीधर युवक जुनेद रजा हे ४६% अस्थि-व्यंगाचे अपंगत्व असतानाही स्वावलंबन साध्य करणारे एक प्रेरणादायी उदाहरण आहेत. शारीरिक अडचणी आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्थिर उपजीविकेची साधने निर्माण करण्यात सुरुवातीला अडचणी आल्या. तरीसुद्धा, त्यांनी सतत प्रयत्नशील राहून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
जुनेद रजा यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यात Youth4Jobs Foundation – भंडारा या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. संस्थेने त्यांच्या क्षमतांची ओळख करून त्यांना कौशल्यविकास प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी दिली. या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक कौशल्ये, प्रभावी संवादकौशल्य, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता इत्यादी उद्योजकतेसाठी आवश्यक घटकांचा समावेश होता. प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, व्यावसायिकता आणि व्यवहारकुशलता विकसित झाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रंग दे यांच्या माध्यमातून ₹४०,००० आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी स्वतःचे सेतूकेंद्र (सायबर कॅफे) सुरू केले. त्यांनी व्यवसायातील कामकाज सुबकपणे सांभाळत ग्राहकांना विश्वसनीय सेवा देण्यावर भर दिला आणि अल्पावधीतच व्यवसायाला स्थिरता प्राप्त झाली. सध्या ते वार्षिक ₹१,४४,००० उत्पन्न मिळवत असून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवत आहेत.
जुनेद यांनी जिददीने व मेहनतीने , योग्य कौशल्यविकास, संस्थात्मक मार्गदर्शन आणि आवश्यक आर्थिक सहाय्य मिळाल्यास अपंगत्वावर मात केली. त्यांच्या कार्यातून Youth4Jobs Foundation च्या उपक्रमांचे उपयुक्तत्व अधोरेखित होते. भविष्यात व्यवसाय विस्ताराचा त्यांनी निर्धार व्यक्त केला असून, त्यांची ही प्रगती इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. युथ फॉर जॉब ही ग्रासरूट ॲक्डमी ही दिव्यांग तरूण – तरूणींना कौशल्य विकास, उपजिविका निर्मीतीमध्ये समुदाय सहभागाव्दारे सक्षम व सबळ करण्यासाठीचा अभिनव उपक्रम आहे. मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातुन राज्य शासनासोबत युथ फॉर जॉब ही संस्था दिव्यांगाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करते. हा उपक्रम गेल्या तीन वर्षां पासनू महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. तळागाळातील तरूण –तरूणीपर्यत पोहोचून शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवणे हे युथ फॉर जॉबचे ध्येय आहे.

