LatestNewsगोंदियाविदर्भ

Inter caste marriage: आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५० जोडप्यांचा सत्कार

लाडक्या बहिणींचा केला साडीचोळी देऊन सन्मान

भावपूर्ण सत्काराने गहिवरल्या लाडक्या बहिणी

सार्वजनिक गाव उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम

नवेगावबांध : नेहमीच गावात आगळे वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत ख्याती असलेल्या,येथील सार्वजनिक गाव उत्सव समिती नवेगावबांधच्या वतीने रक्षाबंधना निमित्ताने नुकताच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यात उभयतांच्या सत्कारा बरोबरच, लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून साडीचोळी भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. झालेल्या सत्काराने लाडक्या बहिणी मात्र गहिवरून गेल्या.कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे यांच्या शुभहस्ते झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा शिवसेनाप्रमुख शैलेश जायस्वाल हे होते. सहउद्घाटक म्हणून उद्योगपती नितीन पुगलिया, रंगमंच पूजक म्हणून जिल्हा परिषद सदस्य रचना गाहणे,उपसरपंच रमेश डोंगरवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पाहुणे म्हणून संतोष नरुले, जगदीश पवार,देवाजी कापगते, संजीव बडोले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप शिपानी, सोनाली नाकाडे, सीमा बडोले, पूजा कापगते, दुर्गा शहारे, शितल राऊत, भिमाबाई शहारे, सुनंदा टेंभुर्णे, हरी मेश्राम, वसंत उजवणे विशाखा साखरे, टुणेश तर्जुले, नरेश बडोले, श्रीनिवास राले, हरिश्चंद्र लाडे, जयंत कोल्हे, भूपेश काशीवार,जयंत लांजेवार, अशोक हुकरे, देवेश कांबळे पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या,नाविन्यपूर्ण कार्यक्रमात गावातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५० जोडप्यांचा सत्कार करण्यात आला आहे.लाडक्या बहिणींच्या मनोरंजनासाठी सुपरफास्ट डान्सिंग क्वीन,लावणी सम्राज्ञी मयुरी मुंबईकर यांच्या ग्रुपचा पारिवारिक व मराठमोळ्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक सचिन सांगोळकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन समितीचे अशोक परशुरामकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार विलीन बडोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष तुकाराम मेश्राम, उपाध्यक्ष संजय भुमके, सचिव प्रवीण डोये, विलीन बडोले, गौरव चौधरी, अशोक भुमके, दिलीप पोवळे, योगेश बडोले, अमोल टेंभुर्णे, संदीप बोळणकर यांनी सहकार्य केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *