LatestNewsगोंदियाविदर्भ

खडयांच्या अपघातामुळे जखमी अथवा मृत्यू झालेल्यांना भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहिल-जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची माहिती

भंडारा : सार्वजनिक रस्त्यांवरील खडयांमुळे व उघडया गटारांमुळे नागरिक जखमी व मृत्यू होणाच्या घटना सातत्याने घडत असतात. खड्यांमुळे होणाऱ्या अपघातात जखमी अथवा मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. अशाप्रकारच्या मृतांच्या अपघातांमध्ये जखमी अथवा वारसांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सबंधित विभागाची आहे. खडयांमुळे अपघातात घडल्यास जखमी व मृतांच्या वारसांनी संबंधीत विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलींदकुमार वि. बुराडे यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेमधील आदेशानुसार, नागरिकांना सुरक्षित व सोयीचे रस्ते देण्याची संवैधानिक व कायदेशीर स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकार यांची आहे. त्यात कसूर झाल्यास ती बाब नागरिकांच्या मूलभुत हक्कांची पायमल्ली करणारी आहे. त्यामुळे संबधित संस्था अशा गंभीर घटनांना जबाबदार ठरतात. तसेच महसुलांव्दारे कोटयावधी रूपये वसुल केले जात असले, तरी रस्त्यांची दुरवस्था ही नागरी सुविधा देणाऱ्या संस्थांची उदासीनता दर्शवते. त्यामुळे संबंधीत अधिकारी कंत्राटदार हे पायाभुत सुविधांकरिता गोळा केला जाणारा महसुल त्याच कारणासाठी खात्रीने वापरला जाईल,याबाबत नागरिकांना उत्तरदायी आहेत.
अशाप्रकारच्या अपघातांमंध्ये जखमी झालेल्यांना अथवा मृतांच्या वारसांना संबंधीत नगरपालीका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), म्हाडा, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एन. ए. एच आय.), बांधकाम विभाग नुकसान भरपाई देतील. रस्त्यांवरील खडयांमुळे अथवा उघडया गटारांमुळे अपघात होऊन मरण पावल्यास अशा व्यक्तींच्या वारसांना चौकशीअंती संबंधीत यंत्रणा 6 लाख रूपये नुकसान भरपाई देतील. तसेच जखमी व्यक्तीला चौकशीअंती ५० हजार ते २ लाख ५० हजार नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसान भरपाई ही त्या जखमीला अथवा मृतांच्या वारसांना इतर कायद्यांअतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा वेगळी व ज्यादा असेल, अशी माहीती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातर्फे कळविण्यात येत आहे. संबंधित विभागाने बांधलेल्या रस्त्यांवरिल घटनेसाठी त्या विभागाचे मुख्य सचिव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अशी द्विसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीची बैठक दर १५ दिवसातुन एकदा होईल आणि समिती समोर आलेल्या अर्जाबाबत चौकशी होईल. समितीकडे नुकसान भरपाई बाबत अर्ज करता येईल अथवा समिती स्वतःहुन दखल घेईल. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यांवरील खड्यांमुळे अपचात घडला त्या पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी अपघाताची माहिती चौकशी समितीकडे ४८ तासात देणे बंधनकारक आहे.अशी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकारण विभागचे सचिव मिलिंदकुमार वि.बुराडे यांनी कळविले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *