LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

adivasi ashram shala : आदिवासी आश्रमशाळेचे बांधकाम मंदगतीने

बांधकाम पूर्णत्वास केव्हा येणार?
अर्जुनी मोरगाव :
तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा (adivasi ashram shala) ईळदा येथील इमारतीचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. जुन्या इमारतीच्या ठिकाणी नविन इमारत तयार होत असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळणार, असे मानले जात होते. परंतु, सुरू असलेले बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने इमारत केव्हा तयार होणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. याकडे जनप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे
केशोरीवरून ९ किलोमीटर अंतरावर ईळदा हे गाव आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून आदिवासी शासकीय आश्रम शाळा (adivasi ashram shala) कार्यरत आहे. आश्रमशाळेचे इमारत जीर्ण झाल्याने नवी इमारत तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार नविन इमारत बांधकामाला मंजूरी देखील मिळाली. दोन वर्षापूर्वी बांधकामाला सुरुवात झाली. परंतु हे काम अतिशय मंद गतीने होत असल्यामुळे अजून पर्यंत विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था झालेली नाही. तसेच वस्तीगृहाची व्यवस्था तयार होण्यास आहे. ग्रामीण भागात असल्यामुळे याकडे कोणीच लक्ष देत नाही. इमारतीचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असून बांधकाम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. परंतु, जनप्रतिनिधी व विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने adivasi ashram shala इमारतीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
…………………
शिक्षक संख्याही अपुरी
आश्रम शासकीय शाळेमध्ये (adivasi ashram shala) शिक्षकांची संख्या सुद्धा अपुरी आहे. टीईटी पात्र शिक्षक अजूनपर्यंत आले नाही. तासिका नुसार शिक्षकांची नेमणूक केली जाते. परंतु तो शिक्षक टीईटी पात्र असावा, त्यामुळे शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आश्रम शाळेमध्ये विविध ठिकाणावरून विद्यार्थ्यी येथ असल्यामुळे पालक लक्ष देऊ शकत नाही. त्या ठिकाणी स्थानिक मुले नसतात. तक्रार नसल्यामुळे या विभागातील अधिकारी लक्ष देत नाही. अनुसूचित जमातींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मूलभूत सोयी सुविधाय त्वरित निर्माण करून द्याव्यात, अशी अर्जुनी/ मोरगाव तालुका आदिवासी पिपल्स फेडरेशनचे सचिव किशोर पेन्दाम यांनी मागणी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *