Gondia News; “अंगदान जीवन संजीवनी”अभियानाची आरोग्य विभागाच्या आरोग्य समितीने केली जनजागृती
आरोग्य समिती पदाधिकारी यांनी शपथ व पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती
गोंदिया : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी”अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. 4 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.सभेत जिल्ह्यातील विविध विषयायावर चर्चा करण्यात आली. दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी” अभियानबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने आरोग्य समितीने अवयवदान बाबत शपथ घेवुन पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती सुरेशजी हर्षे यांनी यावेळी अवयवदान हि काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने यासंबंधी माहिती जाणुन घेणे गरजेचे आहे.अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तिचे अवयव (जसे हृदय, यकृत, मूत्रपिंड) आणि ऊती (जसे कॉर्निया, त्वचा) गरजूंना दान करणे, जेणेकरून ते त्यांचे जीवन जगू शकतील किंवा त्यांची दृष्टी परत मिळवू शकतील. हे एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे,ज्यामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळू शकणार आहे. अवयवदान करणे हे एक महान कार्य आहे, कारण यामुळे अनेक गरजू लोकांना जीवनदान मिळू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तिचे अवयव आणि ऊती निरुपयोगी ठरतात, परंतु ते अवयवदान केल्यास, ते दुसऱ्या व्यक्तीसाठी जीवनदान ठरू शकतात.अवयवदान हे एक महान कार्य आहे, ज्याद्वारे आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे, अवयवदानाबद्दल गैरसमज दूर करून, जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्य समिती पदाधिकारी यांनी यावेळी अवयवदान शपथ घेवुन गावपातळीवर त्याचा प्रचार व प्रसिद्धी करण्याचा संकल्प यावेळी केला.अवयवदान बाबत जनजागृती वेळी जिल्हा परिषद सद्स्य सुधा रहांगडाले,रचनाताई गहाणे,छायाताई नागपुरे,वैशाली पंधरे,गिताताई लिल्हारे, डॉ.भुमेश्वर पटले,प्रविण पटले,रुपेश कुथे यांचे सह आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,डॉ.प्रणित पाटील,डॉ.स्वप्निल आत्राम,डॉ.ललित कुकडे, डॉ.दर्शना नंदागवळी,डॉ.निलेश जाधव,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास विंचुरकर,सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद काळे,कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी शाम लिचडे,आरोग्य सहाय्यक प्रशांत बंसोड,आरोग्य पर्यवेक्षक विजय शेंडे उपस्थित होते.