शहरातील नवरात्रोत्सवात खा.प्रफुल पटेल यांचा उत्साहपूर्ण सहभाग
विविध दुगार्माता मंडळांना भेट देत घेतले दर्शन, लावले जयघोष आणि दिल्या शुभेच्छा
गोंदिया : शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वावर गोंदिया शहर भक्तिभाव, उत्साह आणि धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करत आहे. शहराच्या प्रत्येक चौकात आणि परिसरात देवी दुर्गेची आराधना, गरबा-दांडियाचा जल्लोष आणि भव्य सजावट यामुळे संपूर्ण शहर देवीमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी मंगळवारी शहरातील विविध दुगार्माता मंडळांना भेट देत दर्शन घेतले, माता दुर्गेच्या चरणी डोके ठेवून आर्शीवाद घेतला आणि जयघोष लावत भक्तगणांमध्ये सहभागी झाले.
खासदार पटेल यांनी माँ शारदा उत्सव समिती बसंत नगर, मन्नतवाली माताजी सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती मामा चौक, आपली दुर्गा उत्सव समिती त्रिमूर्ती चौक सिव्हिल लाईन, महाराणी सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौक, दुर्गा वाहिनी गरबा उत्सव समिती, शारदा उत्सव समिती मनोहर चौक, मारवाडी युवक मंडळ सर्कस ग्राउंड, सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गांधी प्रतिमा, गुजराती नवरात्री उत्सव मंडळ गुजराती शाळा, टॉकीज चौक दुर्गा उत्सव समिती, मनोहर भाई पटेल यार्ड (गंज मंडी), माँ जगदंबा धाम दुर्गा चौक आणि नवयुवक गरबा उत्सव समिती पोवार बोर्डिंग यांसारख्या प्रमुख मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी माता दुर्गेकडे शहरवासीयांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि ऐक्यासाठी प्रार्थना केली तसेच महाप्रसाद वितरणातही सहभागी झाले.
खासदार पटेल म्हणाले, नवरात्रीचा उत्सव हा श्रद्धा, एकात्मता आणि संस्कृती यांचा संगम आहे. जगज्जननी माँ भवानी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणो, हीच माझी मन:पूर्वक प्रार्थना आहे, असे ते म्हणाले आणि सर्व भक्तगणांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री देवेंद्रनाथ चौबे, नानू मुदलियार, अशोक इंगळे, प्रेम जैस्वाल, हुकुमचंद अग्रवाल, मन्नू गोयल, सुनील अग्रवाल, राजकुमार कुथे, रोशन जैस्वाल, देवेश मिश्रा, रीतेश अग्रवाल, राजकुमार जैन, कमलेश खोकरे, केतन तुरकर, हरगोविंद चौरसिया, मृत्युंजय सिंह, संकल्प जैन, रवि चौरसिया, मुकेश जैन, सविता मुदलियार, संजीव राय, रवि रामटेककर, राकेश शुक्ला, संदीप कोतंकर, राधेश्याम मेंढे, पिंटू ऐडे, संदीप दुबे, गोपाल झवानीया, दिगंबर कुथे, विनोद मानकर, विवेक मडावी, नरेंद्र भाटी, रामप्रसाद कवाडे, कुणाल सोलंकी, अमित अवस्थी, विशाल मोखारे, आकाश पाउलझगडे यांसह शेकडो भाविक उपस्थित होते.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर झालेली खासदार प्रफुल पटेल यांची ही भेट केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग ठरली नाही, तर समाजाला एकत्र आणणारी, सामाजिक ऐक्य दृढ करणारी आणि पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणारी ठरली.

