Tiroda News अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी
खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीला नवे बळ
तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल (praful patel) यांच्या विकासवादी भूमिका व नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील लाखेगाव, बोपेसर, बिरसी सह विविध गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्स्फूर्तपणे घरवापसी केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्ष बळकट होणार, असा विश्वास माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला.

गोंदिया येथील खासदार प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून व जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले यांच्या उपस्थितीत सर्वश्री नरेश जुनेवार, भास्कर जुनेवार, अंकित गोखले, रामेश्वर खोब्रागडे, अजयवंता पाटिल, सुनीता कोहड़े, डिलेस्वरी चौरागड़े, प्रीति चौरे, भूमेश्वरी खोब्रागडे, दिलीप बिंझाड़ें, रमेश कोहड़े, मनीराम खोब्रागडे, भेदराम बिंझाड़े, टोपलाल भोयर, रामचंद मारबते, अशोक बावने, रमेश कोहड़े, सुनील भेलावे, प्रल्हाद सूर्यवंशी, इन्द्रप्रसाद चौरे, रविचन्द दूधबर्वे, गणेश हरकंडे, टॉनिक भगत, हरबाजी खोब्रागडे, चुनीलाल पाटिल,रमेश वाघमारे, छोटेलाल पटले, छबिलाल गोखले, प्रेमनारायण टेकाम, चरणदास टेकाम, प्रदिप बिंझाड़े, शिवा तुमसरे, प्रदीप भगत, देवदास पटले, भाउदास पटले, राधेश्याम सुरभलावी, विनोद भेलावे, विनोद तुमसरे, हंसराज शेंडे, दिलदार पटले, आसाराम पाटिल, नितेश बिंझाड़े सह कार्यकर्त्यांना पक्षात औपचारिकरित्या घरवापसी करण्यात आली. प्रवेशामुळे तिरोडा तालुक्यात पक्ष संघटन व मजबुतीसाठी निश्चितच पक्षाला बळ मिळणार आहे. घरवापसी करतांना प्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, विकासाचा दृष्टिकोन व खासदार श्री प्रफुल पटेल यांचे नेतृत्व हेच आमच्या पुन्हा पक्षात येण्यामागचे मुख्य कारण आहे.
या वेळी राजेन्द्र जैन, प्रेमकुमार राहंगडाले, राजलक्ष्मी तुरकर, देवेंद्रनाथ चौबे, योगेंद्र भगत, केतन तुरकर, जगदीश बावनथड़े, नानू मुदलियार, संदीप मेश्राम, बाड़ा हलमारे, राजकुमार ठाकरे, राजेश तुरकर, श्याम शरणागत, खिलेंद्र चौधरी, टेकलाल सोनवाने, देवेन्द्र चौधरी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.