International Day of Older Person : 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस
भंडारा : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाच्या निदेशक तत्वानुसार ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या त-हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण निर्गमीत करण्यात आलेले आहे. शासन परिपत्रक दिनांक 22 सप्टेंबर, 2025 नूसार दि. 1 ऑक्टोंबर 2025 हा दिवस “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” (International Day of Older Person) साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
त्यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जि.प.चौक, भंडारा येथे दि. 1 ऑक्टोंबर, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” (International Day of Older Person) दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.रविंद्र वानखेडे सर यांनी भुषविले व उद्घाटक म्हणू नश्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून श्री.हिरामण लांजेवार अध्यक्ष जिल्हा जेष्ठ नागरीक मंडळ, (फेस्कॉम) भंडारा, सचिव, भंडारा जिल्हा जेष्ठ नागरीक मंडळ (फेस्कॉम) भंडारा तसेच श्री.शाम कुकडे, योग शिक्षक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक व उद्घाटक श्रीमती कवाडे मॅडम, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,भंडारा यांनी त्यांचे प्रास्ताविकामध्ये जेष्ठ नागरिक केवळ नुसते जेष्ठ नसून ते आपल्या जिवनातील वटवृक्ष असून जेष्ठ नागरीक कार्यक्रम हा फक्त एक दिवसापुरताच साजरा न करता जिल्हयातील जेष्ठ नागरीक यांचे समन्वयाने प्रत्येक महिन्यामध्ये जेष्ठ नागरीकांना बोलावून त्यांचे जीवनातील अनुभव, त्यांना जीवन जगतांना अडी अडचणी अनुभवलेले क्षण हे वसतिगृहातील, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सांगण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रथमत: मान्यवरांचे हस्ते थोरपुरूषांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले तद्नंतर सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये मान्यवर जेष्ठनागरीकांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले तसेच कार्यक्रमाप्रसंगी जिल्हयातील 80 वर्षे पेक्षा अधिक वयांचे उपस्थित जेष्ठनागरीक यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तद्नंतर श्री.शाम कुकडे सर योगा शिक्षक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना जेष्ठ नागरिकांनी त्यांचे आरोग्य प्रबळ ठेवण्याकरीता नियमित योग करणे आवश्यक असून दररोज सकाळी लवकर उठून दिनचर्येस सुरवात करावी. योग प्राणायम करावे असे सांगितले. श्री. श्री.जाधवराव रूषीजी साठवणे अध्यक्ष, भंडारा जिल्हा जेष्ठ नागरीक मंडळ (फेस्कॉम), भंडारा यांनी जेष्ठ नागरीक यांचेकरीता शासकीय कार्यालयामध्ये रूग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे जेणकरून जेष्ठ नागरिकांना रांगेत न लागता त्यांना शासनाच्या सोयीसुविधेचा लाभ घेता येईल. तसेच जेष्ठ नागरीकासाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात यावे. याबाबत शासनामार्फत कार्यवाही होणे गरजेचे आहे असे मत मांडले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र वानखेडे सर यांनी जेष्ठांना त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्यांना वाटते तसे कार्य करून आपले जीवनव्यापन करावे असे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. सदर जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हयातील उपस्थित ज्येष्ठ नागरिकांकरीता आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात विविध व्यांधीच्या LFT, KFT, Lipid Profile, Bllood Sugar, BhA1C, CBC, Blood Pressure इत्यादी तपासण्या जिल्हा शल्य चिकीत्स, सामान्य रूग्णालय, भंडारा यांचे चमुकडून करण्यात आले. सदर आरोग्य तपासणीमध्ये जवळपास 100 ते 150 जेष्ठ नागरीकांनी लाभ घेतला. सदर कार्यक्राचे सुत्र संचलन श्री. विलास रामटेके, कनिष्ठ लिपीक यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. योगराज सावरबांधे, गृहपाल यांनी केले. सदर कार्यक्रमास जिल्हयातील जेष्ठ नागरीक, कार्यालयातील कर्मचारीवृंद, बीव्हीजी – क्रिस्टलचे कर्मचारी व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

