प्रलंबीत समस्या 2 सप्टेंबर पर्यंत मार्गी न लागल्यास 3 सप्टेंबर ला धरने आंदोलन
सेवानिवृत आरोग्य कर्मचारी व शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघेनेचा इशारा
गोंदिया : जिल्हातील सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आरोग्य सेविका व अधिका-यांच्या अनेक समस्या शासन, प्रशासन स्तरावर प्रलंबीत आहेत. सेवानिवृत संघटनेच्या वतीने या संदर्भात अनेकदा विभागासी पाठपुरावा करुन निवेदन देवून चर्चा करण्यात आले. परंतू प्रशासनाच्या वतीने सतत दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आगामी 2 सप्टेंबर प्रर्यंत समस्या मार्गी लावा. अन्यथा संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरने आंदोलन करणार असा इशारा चे निवेदन 19 ऑगष्ट ला पेंशन अदालत च्या दिवसी अधिकारी व पदाधिका-यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने सेवानिवृतांच्या समस्यांना घेऊन प्रशासन व शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. अधिका-यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. परंतू आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. अधिकारी या कडे सतत दुर्लक्ष करीत असून सेवानिवृतांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 2सप्टेंबर पर्यंत सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, माध्यमिक शिक्षक व अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावा. अन्यथा 3 सप्टेंबर 2025 ला धरने आंदोलन करणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे, राज्य उपाध्यक्ष पी आर पारधी, सचिव पी एन बडोले, कोषाध्यक्ष डी एल गुप्ता, उपाध्यक्ष टी बी भेंडारकर, पी बी लांजेवार, आर आर अगडे, तालुका अध्यक्ष डी.एम दखने, डी एन गोलीवार, पी एल पारधी, ओ के बन्सोड, टी एन बहेटवार, रेखा बोरकर, विमल तावाडे, डी सी तुळसीकर, लंजे, सुरेश आष्टीकर, अंबर बिसेन, वाय बी चावके, श्रीकृष्ण कोरे, माहुरे सर, एच एन परसुरामकर, नागभिरे सर, ए के लोगडे, एम जी बनपूरकर, वाय टी येरणे, आर आर चांदेवार, डी टी सलामे, एम के नाकाडे, व सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.

