LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पवनी येथील विशेष रोजगार मेळाव्यात 64 उमेदवारांची प्राथमिक निवड

भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याअनूषंगाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, माँ चंडीका देवस्थान पवनी आणि युवाशक्ती संघटना पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव निमित्त काल दि.30 सप्टेंबर रोजी माता चंडीका मंदिर सभागृह पवनी ता.पवनी जि.भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यामध्ये 7 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण 493 रिक्तपदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण 186 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये पुरूषांची संख्या 146 व महिलांची संख्या 40 इतकी आहे. 110 उमेदवारांनी प्रत्यक्ष आणि 76 उमेदवारांनी गुगलफॉर्मद्वारे नोंदणी केली होती. सदर रोजगार मेळाव्यात 110 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली होती त्यापैकी 110 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यापैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.
सदर रोजगार मेळाव्याच्या उदघाटनीय कार्यक्रमात उदघाटक तथा प्रमूख अतिथी म्हणून युवाशक्ती संघटना पवनीचे अध्यक्ष तथा व्यापारी संघटनाचे अध्यक्ष देवराज बावनकर हे उपस्थित होते. तसेच,.सुधाकर झळके सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा,चंडीका माता मंदिरचे अध्यक्ष राजूभाऊ ठक्कर, बावनकर पंचायत समिती पवनी, श्रीमती निता पिसे, प्राचार्य महासती बेनाबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी, सचिन पंचबुध्दे, पंकज भूते प्राचार्य मायनिंग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर, श्री योगेश बावनकर, प्राचार्य संत जगनाडे महाराज खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी, गोमासे सहायक प्रशासन अधिकारी पंचायत समिती पवनी, सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भंडारा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच, Vaibhav Enterprises Nagpur (TPA-NAPS/NATS) यांचेकडून श्री मयूर सर व सागर सर, SIS Security and Intellignece Services (India) Limited Nagpur यांचेकडून श्री सुरज सिंह व श्री सतीश बावणे, LIC Bhandara यांचेकडून पंकज वैद्य,श्री प्रणव गजभिए,श्री अमीत दिप्ते,श्री किरण कावळे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन भंडारा यांचेकडून श्री अजय यादव व श्रीमती वैशाली सरदार, SBI Life Insurance Bhandara यांचेकडून अनिल हेडाऊ व श्रीमती कांचन नरलांडे ,Relience Nippon Life Insurance यांचेकडून श्री अंकीत मेश्राम आणि श्रीराम फायनान्स लिमीटेड यांच्याकडून श्री जितेंद्र नागपूर हे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी जिल्हयातील युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयामार्फत रोजगार मेळावा आयोजित केले असल्याचे सांगीतले. उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमेदवारांनी सुरूवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत तसेच उमेदवारांनी आवश्यक कौशल्य आत्मसात करून रोजगाराची संधी प्राप्त करावी. उमेदवारांना रोजगार सुरू करण्यासाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा याबाबत उमेदवारांना बहूमुल्य मार्गदर्शन केले. त्यांनतर देवराज बावनकर यांनी उपस्थित उमेदवारांना बहूमुल्य मार्गदर्शन केले. तदनंतर, श्रीमती निता पिसे यांनी उपस्थित उमेदवारांना जिल्हयातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पकालावधीचे कौशल्य प्रशिक्षण सुरू होणार असून त्याचे दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी देशाचे प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे सांगीतले. सदरच्या कोर्समध्ये जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले.
या रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार योगेश बावनकर यांनी मानले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील श्री.डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री.विजय पांडव, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्री.श.क.सय्यद वरिष्ठ लिपीक, श्रीमती.आशालता वालदे कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्रीमती. प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, श्री.सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक,श्री.अविनाश खेडीकर जिल्हा कौशल्य विकास सहायक, श्री.एजाज शेख शिपाई आदींनी परीश्रम घेतले. तसेच, युवाशक्ती संघटना पवनी आणि माँ चंडीका देवस्थान पवनी येथील अध्यक्ष व इतर कर्मचारी वृंद आदींनी सहकार्य केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *