ठिकठिकाणी देवी मंडपांना सौ.वर्षा पटेल यांची भेट; दर्शन घेत आयोजकांशी साधला संवाद
गोंदिया : जिल्ह्यासह शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानुरूप गोंदिया येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने भव्य मंडप साकारून मॉ दुर्गा मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी सौ.वर्षाताई पटेल यांनी विविध ठिकाणच्या देवी मंडपांना भेट देवून दर्शन घेतले. तसेच आयोजित कार्यक्रमात हजेरी लावून संवाद साधला.
नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने मोठ्या भक्तीभावात आदिशक्तीचा जागर केला जात आहे. भव्य मंडप, आकर्षक रोषणाई आणि विराजनमान माता दुर्गाचे दर्शनासाठी गावखेड्यातून मोठ्या संख्येत भाविक शहरात दाखल होत आहेत. यामुळे शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे. त्यातच सौ.वर्षाताई पटेल ह्या गोंदिया आल्या आहेत. दरम्यान तंनी शहरातील शारदा उत्सव समिती मनोहर चौक, अपनी दुर्गा उत्सव मंडळ, त्रिमूर्ती चौक, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, इंगळे चौक, सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गांधी प्रतिमा, श्री टॉकीज चौक दुर्गा उत्सव समिती आदि ठिकाणी माता दुर्गाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे आयोजित कार्यक्रमाला भेटी दिल्यात. तसेच मातृ शक्ती दुर्गा वाहिनी रास गरबा, मारवाड़ी युवक मंडळ व राजस्थानी महिला मंडळाव्दार आयोजित भव्य रास गरबा ठिकाणी भेट देवून आयोजकांशी संवाद साधला. यावेळी देवेन्द्रनाथ चौबे, महेश गोयल, रितेश अग्रवाल, रोशन जायस्वाल, ज्योति अग्रवाल, भावना खंडेलवाल, हुकुमचंद अग्रवाल, हेमेंद्र पोद्दार, रवि मूंदड़ा, अशोक इंगळे, राजू जैन, बालमुकुंद महेश्वरी, निशिता अग्रवाल, चीनू अजमेर, भैयू चौबे, राकेश शिवहरे, प्रदीप जायस्वाल, अमृत इंगळे, सचिन अग्रवाल, अमित अवस्थी, उमेद भेलावे, सचिन अवस्थी, अंकित कुलकर्णी, वंदना पथक, स्नेहल इटानकर, रंजना कुलकर्णी, रिता अरोरा, अंजू जायस्वाल, सुनील अग्रवाल, मुकेश अग्रवाल, प्रेम जायस्वाल, मृत्युन्जय सिंग, हरगोविंद चौरसिया, संकल्प जैन, यश चौरासिया, राजू गिल, करण गिल भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

