LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

दारू अड्डावर धाड, १० लाखांचा बनावट दारूसाठा जप्त

गोरेगाव पोलिसांची कारवाई

गोरेगाव : शहरातील एका भागात बनावट दारू तयार त्याची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ७:३० वाजता धाड टाकून विविध कंपन्याच्या बनावट दारूसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हेमंत पदमाकर याला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार गोरेगाव शहरातील हेमंत पदमाकर याच्या राहत्या घरी गोरेगाव पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून अंदाजे बनावट दारूचा साठ्यासह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव शहरात बनावट दारू बनवून ही दारू गोरेगाव तालुका आणि इतर तालुक्यात विक्री केली जात होती. शुक्रवारी गोरेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपीच्या घरावर धाड टाकली. या धाडीत बनावट दारूचे मोठे घबाड उघड झाले. जवळपास १० लाख रुपयांची वेगवेगळ्या कंपनीची दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी हेमंत पदमाकर याला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर पिंपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप, पोलीस उपनिरीक्षक प्रीती लांडे, पोलिस हवालदार बिजेंद्र बिसेन, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे नागेश बोपचे, शेखर सोनवाने, हवालदार सुशील रामटेके, पोलिस नायक आम्रपाली, पोलिस नायक राधेश्याम लांजेवार, सुरेश रंहागडाले, पोलीस शिपाई लीलाधर चुटे, सहायक फौजदार मुनेश्वर राऊत, पोलीस हवालदार श्रीकांत धारगावे, चिरंजीव कुंभरे यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *