गंगा जमुना माता मंदिरात 600 मनोकामना अखंड ज्योतीची स्थापना
मंदिराला 6 पिढ्यांचा वारसा व नऊ देवींचे वात्सव्य
अर्जुनी-मोर. : संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे माँ गंगा जमुना माता देवस्थानात सोमवारी 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. एक जागृत देवस्थान असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी असते. विदर्भातील भाविक भक्त अखंड मनोकामना ज्योती कलशाची स्थापना करतात यावर्षी दूरवरच्या भाविक भक्तांनी 600 मनोकामना अखंड ज्योती कलसाची स्थापना केली आहे. गंगा जमुना माता मंदिर परिसरात नऊ वेगवेगळ्या देवींच्या मूर्ती असून सहावी पिढी मंदिराची गादी सांभाळत आहे. तर मंदिरा बाहेर असलेला पिंपळ वृक्ष सावली आणि शुद्ध हवा देत असल्याने भाविकांना त्राण हरविल्याचा भाव होतो. गंगा जमुना माता देवस्थानच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोंडगावदेवी येथे चैत्र पौर्णिमा व अश्विन नवरात्र असे वर्षातून दोनदा मातेची यात्रा भरते. व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सन 1840 मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाला सहा पिढ्यांचा इतिहास आहे या मंदिरात सध्या सहाव्या पिढीचे देवस्थानच्या गादीचे वारसदार हेमराज मानकर देवीची गादी सांभाळत असून देवस्थानचा कारभार सांभाळत आहेत.गंगा जमुना माता मंदिर परिसरात नऊ वेगवेगळ्या देवींच्या मूर्ती असून सहावी पिढी मंदिराची गादी सांभाळत आहे. तर मंदिरा बाहेर असलेला पिंपळ वृक्ष सावली आणि शुद्ध हवा देत असल्याने भाविकांना त्राण हरविल्याचा भाव होतो. गंगा जमुना माता देवस्थानच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोंडगावदेवी येथे चैत्र पौर्णिमा व अश्विन नवरात्र असे वर्षातून दोनदा मातेची यात्रा भरते. व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सन 1840 मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाला सहा पिढ्यांचा इतिहास आहे या मंदिरात सध्या सहाव्या पिढीचे देवस्थानच्या गादीचे वारसदार हेमराज मानकर देवीची गादी सांभाळत असून देवस्थानचा कारभार सांभाळत आहेत.

