Navratri festival 2025 : आदिशक्तीचा जागर; शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
गोंदिया : गणेशोत्सवापाठोपाठ शारदीय नवरात्रोत्सव देखील चैतन्याची लहर घेऊन आला आहे. आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून आज, सोमवार २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri festival 2025 ) सुरूवात होत आहे. घटस्थापनेसह आदिशक्तीच्या उपासनेसाठी शहरासह जिल्ह्यातील देवी मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरांची रंगरंगोटी, स्वच्छता, घटस्थापनेची पूर्वतयारी पूर्णत्वास आली असून पारंपरिक पध्दतीने मंदिरांमध्ये घटस्थापना होणार आहे. आदिशक्तीच्या आगमनासाठी जिल्हावासी सज्ज झाले असून यंदा जिल्ह्यात ६१९ ठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून आदिशक्ती तर ५९४ ठिकाणी शारदा मुर्ती विराजमान होणार आहे.
हिंदू संस्कृतीत नवरात्रीच्या (Navratri festival 2025 ) नऊ दिवसांना फार महत्व असते. या नवरात्र उत्सवाला सर्वाधिक शुभ व पुण्यदायी मानले जाते. नवरात्रीच्या पावन पर्वात आदिशक्तीचे नऊ स्वरूपात पुजन केले जाते. सर्वपित्री अमावस्येनंतर उद्या (ता.२२) पासून अश्विनी शुध्द प्रतिपदेला नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी तयारी पूर्णत्वास आली आहे. सार्वजनिक मंडळे व मंदिर समिती या उत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्या, २२ सप्टेंबर रोजी घट स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळातर्पेâ देवीमुर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. यासाठी तयारी पूर्ण झाली असून सार्वजनिक मंडळातर्पेâ भव्य देखावेपूर्ण मंडप, आकर्षक रोषणाई, चौकांचे सौंदर्यीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नऊ दिवस सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधानात्मक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. शारदीय नवरात्रोत्सवाने (Navratri festival 2025 ) भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाल असून जिल्ह्यात ६१९ ठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून आदिशक्ती तर ५९४ ठिकाणी शारदा मुर्ती विराजमान होणार आहे.
…….
पोलिसांचा कडा पहारा
उत्सव दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे, त्याच बरोबर भक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर येऊ नये, या उद्देशाने जिल्हा पोलिस विभाग नवरात्र दरम्यान चोख बंदोबस्त ठेवणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय असे की, गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर करडी नजरही ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलिस विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्तात जवळपास दीड ते दोन हजाराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत.
…………………
३९ गरबाचे आयोजन
गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा (Navratri festival 2025 ) उत्साह मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो. यासाठी भाविक सज्ज झाले असून विविध धार्मिक आयोजनही आयोजित आहेत. नवरात्रोत्सव दरम्यान ३९ ठिकाणी गरबाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये गोंदिया शहर १०, रामनगर ११ ठिकाणी, रावणवाडी १, आमगाव ५, गोरेगाव ३, सालेकसा २, गंगाझरी, देवरी, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध याठिकाणी प्रत्येक एक तर डुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत तीन ठिकाणी गरबा आयोजन करण्यात येणार आहे.
……………….
जिल्ह्यात विराजमान देवी मुर्ती
शारदीय नवरात्रोत्सव (Navratri festival 2025 ) २२ सप्टेंबरपासून साजरा केला जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक मंडळाकडून आदिशक्तीच्या मुर्तीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीतील गोंदिया शहर ४१, रामनगर २३, गोंदिया ग्रामीण ५५, रावणवाडी ६०, आमगाव ९२, गोरेगाव ५२, सालेकसा ८२, तिरोडा ५५, दवनीवाडा ४०, गंगाझरी ४५, देवरी ०९, डुग्गीपार २१, अर्जुनी मोरगाव २७, नवेगावबांध ०५, चिचगड ०४ व केशोरी पोलिस ठाणे हद्दीत ८ ठिकाणी आदिशक्ती विराजनमान होणार आहे.

