दशरथटोला येथे पोत्यात कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
दशरथटोला/बामणी परिसरातील घटना
परिसरात खळबळ; चर्चांना उधाण
सालेकसा : तालुक्यातील दशरथटोला/बामणी परिसरात पोत्यात कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना आज (ता.२०) सकाळी ९ वाजता सुमारासची आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. सदर मृतदेहाला घेवून उलटसुलट चर्चांना पेव फुटले असून हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असावी? अशी चर्चा जोमात सुरू आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या तपास कार्याकडे लक्ष लागले आहे. दशरथटोला/बाम्हणी परिसरात काही शेतकरी शेताकडे गेले होते. दरम्यान कुंजलेला वास परिसरात दरवळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान आजुबाजू पाहणी केला असता काही समजून आले नाही. तर काही अंतरावरून तीव्र दुर्गंध येत असल्याचे जाणवले. याची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिसराची तपासणी केली असता धानाच्या पोत्यात एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत असल्याने त्यातूनच दुर्गंध येत असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती होताच परिसरातच एकच खळबळ उडाली. दरम्यान गावकर्यांच्या समक्ष पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेला घेवून विविध प्रश्न निर्माण झाले असून मृत कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या पोत्यात भरून फेकण्यात आले असावे? अशी शंकापूर्ण चर्चा परिसरात आहे. सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तपासकार्याला सुरूवात केली आहे.

