LatestNewsगोंदिया- भंडारा

Accident : भीषण अपघातात वाहनाचा चेंदामेंदा; चालक थोडक्यात बचावला

पालडोंगरी शिवारातील घटना

तिरोडा : तिरोडा-खैरलांजी मार्गावर वाराशिवनीकडे जात असलेले चारचाकी वाहन अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला उलटला. या भीषण अपघातात Accident वाहनाचा चेंदामेंदा झाला. नशिब बलवत असल्याने चालक थोडक्यात बचावला. ही घटना आज (ता.१९) दुपारी ४ वाजता सुमारास पालडोंगरी-भुराटोला शिवारातील आहे. जितेंद्र गोवर्धन विश्वकर्मा (३८) रा.वारासिवनी (मप्र) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

तिरोडा-खैरलांजी मार्गे चारचाकी वाहन क्र.एमपी-५०/सी-७१७२ चा चालक जितेंद्र विश्वकर्मा हा वारासिवनीकडे जात होता. दरम्यान पालडोंगरी-भुराटोला शिवारात भरधाव वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला जावून उलटला. या भीषण अपघातात वाहनाने दोन्ही चाक बाहेर पडले तर इंजीन २५ फुट दूर जावून फेकला गेला. या अपघातात Accident नशिबाने चालक जितेंद्र विश्वकर्मा थोडक्यात बचावला. किरकोळ मार लागल्याने त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.संजय भगत यांनी दिली. अपघाताची Accident माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच गुन्हा नोंद करून तपासकार्य सुरू केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *