स्वस्थ नारी, सशक्त परिवार” मोहिमेचा गोंदियात भव्य शुभारंभ
पहिल्याच दिवशी 953 महिलांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
गोंदिया : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने दि.17 पासुन देशात सर्वत्र “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”शुभारंभ ईंदोरच्या धार येथुन ऑनलाईन माध्यमातुन नरेंद्रजी मोदी यांनी केले. जिल्हास्तरीय “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”या अभियानाचे उद्घाटन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोदजी अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य के.टी.एस. रुग्णालयात संपन्न झाले.त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्वस्थ नारी म्हणजे सशक्त कुटुंब आणि सक्षम समाज. प्रत्येक महिलांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा.”विशेष राष्ट्रीय अभियान दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ असुन सर्व आरोग्य संस्थेत मोफत आरोग्य शिबीरातुन सर्व वयोगटातील महिला,गर्भवती महिला,किशोरवयीन मुली,बालके यांची तपासणी करुन औषधोपचार करुन आवश्यक असल्यास संदर्भ सेवा देवुन शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे प्रास्तविक प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले. जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला महिला पदाधिकारी सिताताई रहांगडाले, युवा रोहीत अग्रवाल, समाजसेवक गजेंद्र फुंडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ.शाम निमगडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ.नितीन कापसे, गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव, अभियान नोडल अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे व डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,आयईसी विभागाचे प्रशांत खरात व केटीएस रुग्णालयाचे डॉ.सुवर्णा हुबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांनी अवयवदान व क्षयरोग निक्षयमित्राची शपथ घेवुन संकल्प केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.कांचन भोयर व संध्या शंभरकर यांनी केले.पहिल्या दिवशी केटीएस रुग्णालयातील आरोग्य शिबीराप्रसंगी 953 लाभार्थींनी लाभ घेतला त्यात प्रामुख्याने 101 नेत्र तपासणी,107 दंत तपासणी, 49 गरोदर माता कार्ड,188 पोषण आहार समुपदेशन, 43 क्षयरोग समुपदेशन , 581 विविध प्रयोगशाळा तपासणी, 138 कर्करोग तपासणी, 145टेलीकन्सल्टेशन सेवा, 232 अवयवदान शपथ व 16 लोकांनी रक्तदान केल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी दिली आहे.
अभियानाच्या पहिल्याच दिवशी जवळपास हजार लाभार्थिनींनी विविध तपासण्या करून आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.हा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असून या उपक्रमाद्वारे महिलांच्या आरोग्याबाबतची जनजागृती अधिक परिणामकारक ठरणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सुरक्षेसाठी या विशेष मोहिमेत गरोदर माता, किशोरवयीन मुली, तसेच प्रौढ महिलांना सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, समुपदेशन आणि उपचार सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी दिली.

