tree plantation : नागराधाम येथे ५२१ झाडांचे भव्य वृक्षारोपण
वृक्षधरा फाउंडेशनचा पुढाकार
गोंदिया : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजामध्ये अधिक दृढ करण्यासाठी आणि हरितगृह परिणामाचा धोका कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून वृक्षधरा फाउंडेशनने पितृपक्षाच्या पावन पर्वानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील नागराधाम येथे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत मोक्षधाम व नागराधाम परिसरात तब्बल ५२१ झाडांचे वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप झाला.
कार्यक्रमाला नागराधामचे सरपंच धनलाल नागपुरे, उपसरपंच नितीन कुंडभरे, ग्रामविकास अधिकारी नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील श्रीमती राखी बांते, पंचायत समिती सदस्या नागरा श्रीमती नंदिनी लिल्हारे, पंचायत समिती सदस्या सावरी श्रीमती सरला चिखलोंडे यांच्यासह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावरी शाखा, नागराधाम शाखा व वृक्षधरा फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसवेक, सहयोगकर्ते आणि मार्गदर्शक मंडळही उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती वाढवून दाखवणे हीच खरी जबाबदारी आहे’ असा संदेश दिला. सर्वांनी मिळून प्रकृतीमातेच्या रक्षणाची शपथ घेतली आणि झाडांचे संगोपन, पाणी देणे, निगा राखणे व संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली. मागील ८ वर्षांपासून गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यात वृक्षधरा फाउंडेशन पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी अखंडपणे कार्यरत आहे. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून १८ हजारांहून अधिक झाडे लावून (tree plantation) ती जपून वाढविण्यात यश मिळाले आहे. फाउंडेशनचा भर केवळ झाडे लावण्यावर नसून, त्यांचे संगोपन, निगा आणि सातत्यपूर्ण संवर्धन यावर आहे. त्यामुळे अनेक झाडे आज मोठी होऊन परिसराला हरितमय बनवित आहेत. या उदात्त हेतुने पितृपक्ष पर्वाचे औचित्य साधून वृक्षधरा फांऊडेशनच्या वतीने मोक्षधाम व नागराधाम परिसरात तब्बल ५२१ झाडांचे वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले.
………………
आठवडाभरापासून तयारी
वृक्षारोपण (tree plantation) सोहळ्याची तयारी मागील आठवडाभर सुरू होती. वृक्षधरा फाउंडेशनच्या स्वयंसवेकांनी वृक्षारोपणासाठी गड्डे तयार करून झाडे लावण्याच्या प्रक्रियेला गती दिली. या कामात ग्रामपंचायत नागराधामने पुरेपुर सहकार्य केले. दरम्यान वृक्षधरा फाउंडेशनेच्या वतीने कार्यक्रम पूर्णत्वास नेला. फाउंडेशनच्या ब्रीद वाक्यानुसार प्रत्येक शाखेतून वर्षभर झाडांची काळजी घेण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातात. पाणी देणे, साफसफाई करणे, गवत काढणे, झाडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक देखभाल करणे या सर्व गोष्टींची जबाबदारी फाउंडेशनने आपल्या कार्यपद्धतीत कायम ठेवली आहे.

