LatestNewsगोंदिया

निर्माणाधीन बांधकामामुळे क्रिडांगणाचे  (playground) अस्तित्व धोक्यात

क्रिडा स्पर्धा व खेळासाठी विद्यार्थ्यांना मोठा फटका
शाळा समितीचे मुकाअ यांना निवेदन
सालेकसा :
तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाचे मैदान (playground)  विकासकामांच्या नावावर लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महाविद्यालयात शैक्षणिक धोरणातंर्गत केंद्र पुरस्कृत संगणक लॅब मंजूर झाली असून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु, इमारत बांधकाम करताना बरीच जागा व्यापत असल्याने खेळासाठी आरक्षित असलेले खेळाचे मैदान (playground) धोक्यात आले आहे. यामुळे शाळेत आयोजित होणार्‍या क्रिडा स्पर्धा व खेळासाठी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. या संदर्भात शाळा समितीच्या वतीने जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/ सातगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्राथमिक शाळेचे क्रिडांगण विकासकामाच्या नावाखाली वापरले जात आहे. सदर शाळेत कान्व्हेंटपासून ते वर्ग १२ वीपर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, खेळाडू वृत्ती आत्मसात व्हावी, या उद्देशाने पुर्वीपार शाळेत क्रिडा स्पर्धांसाठी मैदानाची व्यवस्था केली जाते. त्यानुसारही शाळेतही क्रिडा मैदान (playground)  आहे. परंतु, केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत शाळेत संगणक लॅबला मंजूरी मिळाली असून तिचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम क्रिडा मैदानाच्या (playground) अस्तित्वावर उठले आहे. त्यामुळे क्रिडा सराव व स्पर्धांमध्ये हिरहिरीने सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शाळा, क्लास, अभ्यास, घरी आणि शाळेतही एकच दबाव मग मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने, क्रीडांगणे (playground)  उपलब्ध नसतील तर मग हे मुले खेळण्यासाठी जातील तरी कुठे? असा प्रश्न पालकांकडून्ाही उपस्थित केला जात आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत तोडगा काढण्यासाठी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी, अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आ.संजय पुराम यांना निवेदन दिले आहे.
…………………
शाळा समिती व गावकर्‍यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष
महाविद्यालयात एक संगणक लॅब मंजूर झाली आहे. तिचे बांधकाम जोमात सुरू आहे. इमारत करताना पाच मोठ्या खोल्या तयार करण्यात येणार आहे. यामुळे क्रिडांगणाचा मोठा भाग यासाठी लागणार आहे. अशात शाळेतील क्रिडांगण नावापुरतेच शिल्लक राहणार आहे. या संदर्भात शाळेचा मैदान कमी पडू नये यासाठी शाळा समिती व गावकर्‍यांनी पाच खोल्याऐवजी तीन खोल्या तयार करणे, एल टाईप आकारात इमारत करण्याचे सुचना दिल्या होत्या. मात्र कंत्राटदार व अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले.
………….
नविन कामे जोमात; पण इतर सुविधांचे काय?
जि.प.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात पूर्वीचे एक संगणक लॅब तयार करण्यात आलीआहे. परंतु, व्यवस्थापनाअभावी लॅब भंगारजमा झाली आहे. सर्वच संगणक बंद स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, टेबल, खुर्च्या नाहीत. शिक्षण देणारे शिक्षक बाहेरगावून ये-जा करतात. शौचालयाची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी व्याप्त असल्याने विद्यार्थीही त्या ठिकाणी जाणे टाळतात. याकडे लक्ष देण्याऐवजी नविन बांधकामाचा सपाटा सुरू करण्यात आल्याने पालकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. विकासकामे विकासासाठी की मलई लाटण्यासाठी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *