पांढरी येथील बसस्थानक घेतेय अखेरचे श्वास!
प्रवासी निवार्यात जनावरांचा ठिय्यारस्त्याची उंची वाढल्याने स्थानकाची दुरावस्था
सडक अर्जुनी : तालुक्यातील पांढरी येथील, प्रवाशी निवार्याची अत्यंत दैना अवस्था झालेली आहे याचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी झाले असून त्यानंतर आज पावतो कसल्याही प्रकारची देखरेख,दुरुस्ती केल्या गेली नाही. त्याकारणाने प्रवाशी निवारा घाण व कचर्याच्या विडख्यात सापडलेला आहे.काही वर्षांपूर्वी, मुरदोली- कोसमतोंडी या मुख्य मार्गावर, बस फेर्या सुरु होत्या, त्यावेळी या मार्गावरील प्रवाशी निवारे प्रवाशांमुळे गजबज असायचे. पण. कालांतराने या मार्गा वरिल बसफेरी बंद झाली. तेव्हा पासुन,प्रवाशी निवार्यांचे हाल बे हाल झाले. बरेचशे निवारे तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
पांढरी येथील प्रवाशी निवार्या सामोरून, जाणार्या मुरदोली ते कोसमतोंडी रोडाचे बांधकाम मागील पंधरा वर्षात पाच वेळा करण्यात आले त्यामुळे रोड ची उंची वाढल्याने बस स्थानक खोल भागात गेलेला आहे. पावसाळ्यात पाणी साचत असतो व त्यातच त्या परिसरात वाढलेला केर कचरा, त्यामुळे प्रवाशी निवारा त्यात जाणे अशक्य झालेले आहे.परिसरातील, मुरदोली, गोंगले,पांढरी, चिचटोला, कोसमतोंडी या गावांमध्ये प्रवाशी निवारे आहेत. काहि गावामध्ये स्थानिक प्रशासनाने, निवार्यांची रंगरंगोटी केलेली आहे.पण संबधित विभागाणे परिसरातील प्रवाशी निवार्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने ग्रामीण क्षेत्रामधील प्रवाशी निवारा अतिशय महत्वाचा मानला जातो.. बसच्या प्रतिक्षेत काहि वेळापुरताच विसावा या प्रवाशी निवार्यांत असतो.पैकी बरेचश्या गावामध्ये बसफेरी पुर्णतः बंद झालेली आहे.
………………..
जनावरेही बांधले जातात
काहि प्रवाशी निवार्यात पशुपालक, जनावरे बांधत असतात. कहि ठिकाणी जनावरांना लागणारी तणीस दिसुन येते. पूर्वी पांढरी येथून, गोंदिया, साकोली आगाराच्या मोठ्या प्रमाणात बसेस चालायच्या, पण पांढरी येथे रेल्वे स्थानक असल्यामुळे तसेच बस भाड्याच्या तुलनेत, रेल्वे प्रवाश कमी खर्चाचा व आरामदायक ठरत असल्याने, बसेस साठी प्रवाशी मिळणे कठिण झाले होते. परिणामी या मार्गावरिल बसफेर्या बंद झालेल्या आहेत.

