LatestNewsगोंदिया

102 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनद्वारे (cancer mobile van) तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र बेरडीपार येथे कर्करोग तपासणी शिबीर संपन्न
गोंदिया :
प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या (cancer mobile van) व्हॅनमध्ये आहे.गोंदिया तालुक्यातील आरोग्य संस्थाची तपासणी शिबीरे संपल्यानंतर दि.30 ऑगस्ट रोजी तिरोडा तालुक्यात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन दाखल झाली. दि.30 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोरा येथे शिबीर यशस्वी होऊन 111 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. दि.1 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बेरडीपार व दि.2 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक येथे कर्करोग तपासणी शिबीरे होणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली आहे.
1 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बेरडीपार येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 102 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये (cancer mobile van) आपली तपासणी केली असुन त्यात 74 मुख कर्करोग,24 महिलांची गर्भाशय कर्करोग व 4 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.रजनीश डोंगरे यांनी यावेळी दिली आहे. (cancer mobile van) मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी. तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे.

मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सविता लोणेर,मुखरोग तज्ज्ञ डॉ.अनिल आटे व शल्यचिकित्सक डॉ.तुषार डहाके,स्टाफ नर्स मनिषा रहांगडाले व योगेश्वरी केंद्रे यांनी लाभार्थ्यांची विविध तपासणी केली. कॅन्सर तपासणी शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,वैद्यकीय अधिकारी डॉ.रजनिश डोंगरे व डॉ.दिपक रहांगडाले यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला पदाधिकारी जि.प.सदस्य पवनभाऊ पटले,तिरोडा पं.स.उपसभापती सुनंदाताई पटले व ग्राम बेरडीपारचे सरपंच चेतना कोलटकर यांनी भेट देवुन पाहणी केली आणि यावेळी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले. सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहायिका, आरोग्य सेवक व सेविका, आशा सेविका, परिचर व इतर सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या मदतीने व जाणभागीदारीने हे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन (cancer mobile van) गोंदिया जिल्ह्यात 21 ऑगस्ट पासुन विविध 7 ठिकाणी आरोग्य संस्थामध्ये कर्करोग तपासणी शिबीरे झाली आहे.आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 33 आरोग्य संस्थेतील गावात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन द्वारे महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *