LatestNewsगोंदिया

नंगपुरा-मुर्री शासकीय निवासी शाळेचा लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय स्पर्धा : लोकसंख्या शिक्षण दिल्लीचे उपक्रम
गोदिंया :
शहराला लागून असलेल्या नंगपुरामुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेचा आदिवासी पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेत केवळ एक गुणांच्या फरकाने द्वितीय क्रमांक पटकावण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी श्री. डोंगरे, गट समन्वयक श्री. परतेकी, परिक्षक ढावळे, गोटेफोडे तसेच तालुक्यातील सहभागी शाळांचे शिक्षक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पंचायत समिती गोंदिया गटशिक्षणाधिकारी कार्यालय गटसाधन केंद्र कटंगी (कला) येथे (दि. १ सप्टेंबर) सकाळी ११.०० वा आयोजित करण्यात आले होते. लोकसंख्या शिक्षण उपक्रम या शासनाच्या अंतर्गत कला महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये तब्बल १२ प्रकारातील कलात्मक कौशल्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दरवर्षी आयोजन होते. सदर उपक्रमात फक्त एक गुणांच्या फरकाने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरामुर्री या शाळेला हेतुपुरस्सर द्वितीय क्रमांक देण्यात आले. लोकनृत्य सादरीकरणाची संकल्पना, थीम, चित्राकिंत संदेश अशी वैविध्यपूर्ण निर्मिती मुन्नाभाई नंदागवळी यांची होती. यामध्ये सहभागी नैतीक सचिन कुडवे, तन्मय अमरदीप वासनिक, तुषार देवानंद साऊस्कार, कुणाल हिमंत बडोले, नृत्य व मार्गदर्शक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी, आशिष शहारे यांनी सहभाग घेतला होता. प्रसंगी मुख्याध्यापक रविशंकर इठुले, नीता भलमे, साधना पारधी पुष्करराज लांजेवार, प्रदीप ढवळे, कार्तिक शहारे, दीक्षा तुरकर, तुषार महाजन यांनी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *