LatestNewsगोंदिया

सावधान ! नागरिकांनो स्क्रब टायफस पासुन सावध रहा : जिल्हा आरोग्य अधिकारी   गोल्हार 

गोंदिया : स्क्रब टायफस Scrub Typhus हा आजार खरं तर आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ असा आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील “ऑरियंटा सुट्सुगामुशी ” नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. ट्रॉम्बिक्युलिड माईटसचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात, ते चावल्यामुळे हा आजार होतो. या जिवाणूंचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो. जिथे झाडे-झुडूप आणि गवत वाढलेले असते अशा ठिकाणी हे चिगर माईट्स जिवाणू असतात. अशा ठिकाणाहून जात असताना हा जंतू चावल्यास व्यक्तीला हा रोग होतो. या आजाराचे कीटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे अशा भागात आढळतात. हे कीटक लाल, शेंदरी पिवळ्या रंगाचे असतात. पूर्ण वाढ झालेली कीटक चावा घेत नाहीत. लारवा स्वरूपात असलेले कीटकच चावा घेतात. शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूर, गावाच्या टोकाला राहणारे लोक, अर्धा बायाचे किंवा तोकडे कपडे घालणारे व्यक्ती,हात मोजे न घालता काम करणारे मजूर व रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचं म्हटलं जाते. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होऊन मरण पावतात त्यामुळे हा आजार होऊ किंवा पसरू नये म्हणुन सर्वानी काळजी घेणे महत्वाचे असल्याचे डॉ. गोल्हार यांनी माहीती दिली आहे.
पावसाळ्यात अनेक आजारांचा प्रकोप दिसून येतो. राज्यात स्क्रब टायफस Scrub Typhus आजाराचे रुग्ण दिसत आहे. राज्याने सर्व जिल्ह्यांना स्क्रब टायफस आजाराविषयी व्यापक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन नागरिकांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.आपला जिल्हा हा जंगलव्याप्त व झाडे झुडपेने नटलेला आहे. जंगलव्याप्त, ग्रामीण व शहरी भागात आढळून येणाऱ्या विशेषता गाजरगवतावर आढळणाऱ्या किड्याने चावा घेतल्याने या रोगाचा प्रसार होत असतो.त्यामुळे सावधगिरी बाळगणे हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी म्हटले आहे.
Scrub Typhus यावर उपाय : संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे.घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडे झुडुपी नष्ट करावी.घरातील उंदीर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे. घरातील साफसफाई वर विशेष लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे दिसत डॉक्टरांना दाखवावे. 
आजाराची लक्षणे :  तीव्र ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, मळमळ होणे, चालताना तोल जाणे , सुस्ती चढणे, शरीरात कंपन सुटणे, कोरडा खोकला, निमोनिया सदृश आजार, अंगावर चट्टे येणे, खाज सुट्टे,जखम होऊन खिपल पकडणे आणि काही रुग्णांमध्ये किडा चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो.आधी लक्षणे आजाराची आहे.
…………………………………………………………
 Scrub Typhus : अशी घ्यावी काळजी 
 माईट(कीटक) नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा.
 झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्याचे कपडे, हातमोजे, गमबूट वापरावेत.
खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे.
झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत.
 स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या घराच्या जवळील छोटी मोठी खुरटी झाडं झुडपं काढून टाकावीत.
संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो.या रोगाची लक्षणे साधारण चिकन गुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. स्क्रब टायफस या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. 
त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. पण साथीच्या वेळी डॉक्टरकडे जाणे आणि वेळेत औषधोपचार, अ‍ॅन्टीबायोटिक्स घेतल्याने या रोगापासून बचाव होतो.लोकांचे जनजागरण, उंदरावर नियंत्रण आणि लवकर निदान झाले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.
………………………………………
हे करा
दाट झाडाझुडपात जाऊ नका.
शेतात किंवा जंगलात काम करताना पूर्ण बाह्याचे कपडे, हातमोजे, गमबूट वापरावेत.
पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला.
घरात आणि बाहेर स्वच्छता पाळा.
डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 काही रुग्णांमध्ये कीडा चावल्यास चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *