LatestNewsगोंदिया

ईद-ए-मिलादनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुस्लिम बांधवांचे जल्लोषात स्वागत!

गोंदियात कौमी एकतेचे दर्शन; विशाल अग्रवाल व सचिन शेंडे यांच्यासह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती
गोंदिया : ईद-ए-मिलादच्या पवित्र आणि म्हात्वाच्या सणानिमित्त गोंदिया शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रॅली/जुलूस काढून पैगंबर साहेबांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात त्यांचे प्रतिनिधीद्वय विशाल गोपालदास अग्रवाल, शहराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानाजवळ जुलूसचे सदर ईशानभाई शेख व सर्व मुस्लिम समाजबांधवांचे पुष्पगुच्छ देऊन भावूक स्वागत (इस्तकबाल) केले व सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना विशाल गोपालदास अग्रवाल व सचिन शेंडे म्हणाले, ‘ईद-ए-मिलाद हा सण सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि कौमी एकतेचा संदेश देतो. गोंदिया शहरातील सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होऊन एकात्मतेचे उत्तम उदाहरण सादर करतात. गोंदिया विधानसभा क्षेत्रात जेवढ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते, तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने ईद-ए-मिलादचा सण साजरा केला जातो. संपूर्ण देशात व गोंदियात हा सामाजिक बंधुभाव कायम राहावा, हीच प्रार्थना आहे.’
या स्वागत सोहळ्यास माजी नगरसेवक शकीलभाई मन्सुरी, अशोक चौधरी, अजय गीर, मनोज पटनायक, नगरसेवक राकेश ठाकूर, अमर रंगारी, रूपेश नशिने, चंद्रकुमार चुटे, सुनिील भालेराव, नफिसभाई सिद्दीकी, अरमान जैसवाल, आसिफ अंसारी, अमर मिश्रा, श्रीकांत चांदूरकर, संदीप रहांगडाले, सचिन मेश्राम, माजी जि.प. सभापती अर्जुन नागपूरे, कुडवा संचालक पप्पू पटले, राकेश वर्मा, जिल्हा सहकारी बँक संचालक अशोक (गप्पू) गुप्ता, बंटी कटरे, अरुणकुमार दुबे, गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी राधेलाल पटले, संजू माने, रियाजभाई मेमन, अमन मेमन, विवेक तिवारी, संकेत तिवारी, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष जमीलभाई पठाण, र्‍एळघ् जिल्हाध्यक्ष अमन मेमन, जाहीरभाई अहमद, हरुनभाई कटंगी, इक्बाल भाई रामनगर, महबूबभाई, दामोदर नेवारे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले, किशोर शेंडे, शुभम अ‍ेंगेवार, युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितेश यादोराव शिवणकर, चंद्रशेखर गौतम, साहिल कुरेशी, देवकांत ब्ाहेकार, माजी जिप अध्यक्ष उषाताई शेंडे, माजी नगराध्यक्ष सुशिलाताई भालेराव यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *