LatestNewsगोंदिया

२० वर्षांपासून सुरू समाजप्रबोधन, लोकजागृतीची अखंड सेवा, कला आणि समाजसेवेचा अनोखा संगम ‌ ‌

भजनाचे बोल, समाजपरिवर्तनाचे मोल

सडक  अर्जुनी : समाजात व्यसनाधीनता आणि कुप्रथांनी आपले पाय रोवले असतांना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील एका महिला भजन मंडळाने २० वर्षांपासून भजन किर्तनाच्या माध्यामातून यशस्वीपणे समाजप्रबोधन, लोक जागृती आणि समाजसेवेचा अनोखा संगम घडवून भजनाचे बोल, समाजपरिवर्तनाचे मोल यावर यशस्वीपणे मात केली आहे. हे केवळ भजन मंडळ नाही, तर ते समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन बनले आहे. ‌

‌ सन २००५ साली स्थापन झालेल्या जय दुर्गा महिला भजन मंडळ रजि.नं.८६४९/२०२१ कोसमतोंडी यांनी सामाजिक गैरसमज दूर करण्याचे ध्येय घेऊन आपला प्रवास सुरू केला.या भजन मंडळात सर्व महिला कलावंत सहभागी आहेत. हे कलावंत केवळ भजन सादर करत नाहीत, तर भजन कीर्तन, भागवत सप्ताह, शारदा उत्सव, गणेशोत्सव,लोककला आणि गवळण कार्यक्रमातून व्यसनमुक्ती, दारूबंदी आणि इतर कुप्रथा विरोधात भजनाचे माध्यमातून जनजागृती करतात.या जय दुर्गा महिला भजन मंडळाने सडक अर्जुनी तालुक्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये आपली कला सादर केली आहे.जन्माष्टमी, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन भजनाचे सादरीकरण करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आता त्यांना बाहेरगावचे निमंत्रण येत आहेत. या महिला भजन मंडळाने अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवून प्रमाणपत्र मिळविले आहे. जिल्हास्तरीय लोककलावंत मेळावा, विदर्भ विभागिय लोककला परिषद साकोली तालुका वतीने जांभळी येथे, भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार परिषद भंडारा तालुका शाखा तुमसर, झाडीपट्टी पर्यटन महोत्सव व आंतरभारतीय लोककला साहित्य संमेलन भंडारा, शारदा उत्सव एकोडी, विदर्भ शाहीर कलाकार जिल्हा गोंदिया तालुका सडक अर्जुनी अंतर्गत खोडशिवनी येथे, माॅ धुकेश्वरी मंदीर देवरी, युवा दांडीया उत्सव कोसमतोंडी, किन्ही/मोखे येथे गणेशोत्सवात भजन सादरीकरण केले आहेत. आजच्या आधुनिक काळातही कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची ही परंपरा जोपासत कोसमतोंडी येथील जय दुर्गा महिला भजन मंडळ ख-या अर्थाने अभिनंदनास पात्र आहे.त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. जी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *