त्या पिडीत कुटूंबियांचे आमदार बडोले यांनी केले सांत्वन
आजारी इसमांना दिला धीर, कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजी.राजकुमार बडोले यांनी २४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील विवीध गावांचा दौरा केला. यामधे मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन, प्रकृती बरी नसलेल्यांची आस्थेने विचारपुस केली. तथा मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेवुन अडीअडचणी समजुन घेतल्या.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात कुठलीही घटना, निधन किंवा आजारी व्यक्ती असोत आ.राजकुमार बडोले त्यांचे परिवारांची भेट घेवुन आस्थेने विचारपूस करतात. सोबतच कार्यकर्त्यांच्या भेटीतुन विकासात्मक कामे, अडीअडचणी याविषयी माहीती घेवुन त्याचा निवाडा करतात. २४ ऑगष्टला आ.राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन कार्यकर्त्यांशी व मतदारांशी हितगुज साधला. सर्वप्रथम खांबी येथील भाजपाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम डोये यांचे आईचे निधन झाल्याने त्यांचे घरी जावुन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तर अरततोंडी येथील शेषराव पातोळे यांचे वडील तुळशिराम पातोळे यांचे निधन झाल्याने त्यांचेही घरी सांत्वनपर भेट दिली. तसेच नवेगावबांध येथील डॉ.अ.का.कापगते यांचे तरुण मुलाच्या प्रकृतीविषयी आस्थेने विचारपूस करुन कुटुंबाला धीर दिला.कोहलगाव येथे आर्मी जवान बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबियांची भेट घेतली तसेच तेथीलच तिन अनाथ मुलिंचीही भेट घेतली. त्यानंतर बोंडगाव/ सुरबन येथील राष्टवादी कॉग्रेसचे दीनदयाल डोंगरवार यांचेही प्रकृतीची विचारपूस केली.यानंतर केशोरी येथे राष्टवादीचे योगेश नाकाडे यांचे निवासस्थानी भेट घेवुन कार्यकर्त्यांशी हितगुज साधला. या संपुर्ण दौर्यात आ.राजकुमार बडोले यांनी अनेक मतदार व कार्यकर्त्यांचे मनोगत व अडीअडचणी समजुन घेवुन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या दौर्याप्रसंगी लोकपाल गहाणे, यशवंत गणवीर, किशोर तरोणे, होमराज पुस्तोळे, भोजराम रहेले, राजहंस ढोके, जयंत लांजेवार, संजय खरवडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

